Headlines

गाड्या उपलब्ध करून द्या

इंटरनॅशनल ह्युमन एम्बेसिडर ऑर्गनायझेशन यांची मागणी:प्रसाधन गृहाची दुरुस्ती करण्याचीही केलीय मागणी.. देवगड ता.०७-:तालुक्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या देवगड आगारात नवीन शयनासनी गाड्या तसेच परिवर्तन गाड्या उपलब्ध करून देण्यात याव्यात .त्याचबरोबर देवगड बस स्थानकामध्ये पुरुष व महिला प्रसाधनगृहाचे दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी इंटरनॅशनल ह्युमन राइट्स एम्बेसिडर ऑर्गनायझेशन देवगड तालुका या संस्थेच्या वतीने आगार व्यवस्थापक देवगड यांसी…

Read More

सिंधुदुर्गातील चार रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट

राज्य शासनाची योजना:उद्या शुभारंभ ओरोस ता.०७-: पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी निर्माण केलेल्या अमृत भारत स्थानक योजनेतील 508 रेल्वे स्थानकांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.या योजनेत राज्यातील 44 स्थानकांचा समावेश आहे.याच धर्तीवर राज्याचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीयमंत्री नारायणराव राणे यांच्या सहकार्याने कोकण रेल्वेच्या 19 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास…

Read More

पंधरा दिवसात प्लॉट वाटप करा अन्यथा सत्तेत असूनही आवाज उठवणार

राजन तेली ; एमआयडीसी बाबत दीपक केसरकर यांची भूमिका चुकीची सावंतवाडीस्थानिक आमदार दीपक केसरकर मोठा उद्योजक आणणार म्हणून आडाळी एमआयडीसी बाबत निर्णय न घेणे कितपत योग्य आहे ज्या अपेक्षेने जनतेने आपल्या जमिनी दिल्या त्यांच्या अपेक्षा लक्षात घेता येत्या पंधरा दिवसात एमआयडीसीमध्ये प्लॉट वाटत नाही झाल्यास सत्तेत असलो तरी याबाबत आवाज उठवावा लागेल असा इशारा माजी…

Read More

अणाव गावात पाच कृषी कन्या दाखल

ओरोस ता ७-:डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान संचलित छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस सिंधुदुर्गनगरी या महाविद्यालयातील बी एस सी चौथ्या वर्षात शिकत असलेल्या कृषिकन्या कुडाळ तालुक्यातील अणाव ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये तनया वळंजू, आशा परब, रसिका कोरगावकर, भाग्यलक्ष्मी नाईक, श्रीया…

Read More

येणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी रहा…

संपर्क प्रमुख शैलेश परब यांचे आवाहन:चौकुळं येथील सभेत दीपक केसरकर यांच्यावर केली टीका ⚡आंबोली, ता.०७-: राष्ट्रवादीचे कारण सांगून शिंदेगटात गेलेले दीपक केसरकर हे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या गाडीच्या मागून धावत होते.उद्धव ठाकरे यांनी एमबीबीएस कॉलेज मंजूर करून १०० कोटी निधी देऊन हट्टी पणामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होऊ शकले नाही इथला म्हणावा तसा विकास झाला…

Read More

कबुलायतदार गावकर प्रश्नी महसूल व वन मंत्र्यांसोबत पुन्हा बैठक घेणार…

राजन तेली; स्थानिकांची दुसरी बाजू मांडून लवकरच न्याय मिळवून देणार.. आंबोली,ता.७: आंबोली कबुलयातदार गावकर प्रश्न सोडवला मात्र महसूल ची जमीन आणि वन ची जमीन एकत्र करून वाटप होण्यासाठी निर्णय घेणे आवश्यक आहे.तसेच कुटुंब निश्चिंती आणि यादी प्रसिद्ध होणे आवश्यक आहे तसेच ग्रामसभेचा ठराव विचारात घेतलेला नाही . शासनाकडून ते राहिलेले आहे. त्यामुळे शासनाकडे आम्ही पुन्हा…

Read More

कै.वाळके मास्तर जयंती निमित्त स्वराज्य संघटना व आजी-माजी विद्यार्थ्यांकडून उद्या शहरात विविध उपक्रम…

⚡सावंतवाडी ता.०७-: कै. वाळके मास्तर जयंती निमित्त उद्या दि. 8 ऑगस्ट रोजी सावंतवाडी शहरांमध्ये स्वराज्य संघटना व आजी-माजी विद्यार्थ्यांकडून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. सकाळी ठीक 8 वाजता वाळके मास्तर व्यायाम शाळेमध्ये स्वराज्य संघटना व आजी माजी विद्यार्थ्यांकडून वाळके मास्तर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर कित्येक दिवस सावंतवाडी नगर परिषदेचे स्विमिंग पूल…

Read More

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री काशीकलेश्वर प्रासादिक मंडळ कलमठ प्रथम

⚡कणकवली ता.०७-: भजन प्रेमी व कला संघ कणकवली यांच्यावतीने येथील परमहंस भालचंद्र संस्थात जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. यात श्री काशीकलेश्वर प्रासादिक मंडळ, कलमठने प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे.श्री नटराज प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी द्वितीय तर श्री स्वरसंगम प्रासादिक भजन मंडळ कासरल तृतीय क्रमांक मिळवला. श्री गुरुप्रसाद प्रासादिक भजन मंडळ करंजे संघाने…

Read More

भाजपच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला भाजपाच्यावतीने ‘आजादी का अमृत महोत्सव‘ अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई यांनी दिली.

Read More

जी. ए. कुलकर्णी शताब्दी संस्मरण कथा अभिवाचन जागर कार्यक्रम

⚡कणकवली ता.०७-: सिंधुदुर्गातील रंगकर्मी वामन पंडित यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या जेष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या कथा अभिवाचन जागर कार्यक्रमातील दुसरा आणि ऑगस्ट महिन्यातील कार्यक्रम ११, १२ आणि १३ ऑगस्ट रोजी अनुक्रमे निलायम, कणकवली, संवाद परिवार, तरळे आणि बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन अभिवाचक जी. ए. च्या…

Read More
You cannot copy content of this page