मंत्री दिपक केसरकर: जिल्हावाशियांना दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा…
⚡सावंतवाडी ता.१८-: ज्या कोकणानं मला जन्म दिला त्या कोकणवासीयांसह सिंधुदुर्ग जिल्हावासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, हा मंगलमय प्रसंग आपल्या जीवनात सुख, समृद्धी अन् भरभराट घेऊन येवो अखंड वैभव सर्वांना प्राप्त होवो. विद्येच्या दैवतानं विद्यार्थांना चांगली बुद्धीमत्ता देवो त्यांची प्रगती घडो अशी प्रार्थना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गणराया चरणी केली. दरम्यान महाराष्ट्रातील सरकार सर्वसामान्यांच सरकार आहे. त्यामुळे प्रत्येकाला न्याय दिला जाईल, सर्व प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास देखील शिक्षणमंत्री यांनी व्यक्त केले.ते सावंतावडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की उद्या गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे घरी गणपतीची पुजा करून नंतर सार्वजनिक गणपतीची पुजा करणार आहे. मुंबई, कोल्हापूरला देखील गणेशोत्सव मंडळांना भेट देत गणरायाची सेवा करणार आहे. आपली माणसं या उत्सवात भेटतात याचा आनंद असतो. दरवर्षी प्रमाणे प्रत्येकाच्या घरी जावं अशी इच्छा आहे. जेवढ्या ठिकाणी जाता येईल त्या ठिकाणी पोहचून गणरायाचे आशीर्वाद घेणार असल्याचे मत व्यक्त करत दीपक केसरकर यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
