⚡कणकवली ता.१८-: महापुरुष सेवा संघ आयोजित लायन्स क्लब ठाणे कोपरी आणि बाळकृष्ण म्हसकर यांच्या सौजन्याने नांदगाव मधलीवाडी येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ५ मधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप करण्यात आले आहे
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोनी, बाळकृष्ण म्हसकर ,आप्पा म्हसकर, वसंत कांदळकर, विठोबा कांदळकर ,श्रीकृष्ण कांदळकर, सुरेश वर्धन , विजय महाजन, सुनील कोरगावकर, रवींद्र म्हसकर, शाळेच्या मुख्याध्यापका जावकर मॅडम आणि शिक्षक वर्ग पालक वर्ग उपस्थित होते.
