Headlines

सामाजिक उपक्रमास नगरपरिषदेचे नेहमीच सहकार्य राहील….

श्री. दिलीप गिरप ; वेंगुर्ला येथे ‘फिटनेस आणि वेलनेस इव्हेंट” कार्यक्रमास नागरिकांचा प्रतिसाद

वेंगुर्ला
नागरिकांनी फिटनेस व आरोग्यदायी मार्गदर्शन अशा कार्यक्रमात सक्रियतेने भाग घेणे आवश्यक आहे. शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी अशा मार्गदर्शन कार्यक्रमात भाग घेऊन नागरिकांनी, विद्यार्थ्यांच्या पालकांनी मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
वेंगुर्ला नगरपरिषद कार्यक्षेत्रात बॅडमिंटन, स्वीमिंग व अन्य इव्हेट सुरु आहेत. आजचा हा कार्यक्रम स्तुत्य उपक्रम असुन पुढील कालावधीतही नगरपरिषदेचे सहकार्य राहील, असे प्रतिपादन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी वेंगुर्ला येथे बोलताना केले.
नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला, वेंगुर्ला नगरपरिषद आणि वर्ल्ड पॉवर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर मिनी हॉल, वेंगुर्ला येथे
‘फिटनेस आणि वेलनेस इव्हेंट वेंगुर्ला २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप हे बोलत होते. कार्यक्रमाचे
उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,
वर्ल्ड पावर इंडिया संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक
संतोष गावडे,
नगरसेवक प्रणव वायंगणकर, इनरव्हील अध्यक्षा ज्योती देसाई, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लाचे दादा साळगावकर, लीनेस क्लब ऑफ वेंगुर्ला अध्यक्ष मृण्मयी केरकर, डॉ. वसुधा मोरे फिटनेस अकॅडमी प्रतिनिधी राम पोळजी,
होम योग साधना च्या
साक्षी बोवलेकर, प्रगती चव्हाण आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांस भाजपा ज्येष्ठ नेते राजू राऊळ, पतंजली वेंगुर्ला तालुका प्रभारी संजय तेरेखोलकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश रेगे, नगरसेवक रवी शिरसाट,
नगरसेविका गौरी मराठे व ऍड. सुषमा प्रभूखानोलकर,
माजी नगरसेवक उमेश येरम, डॉ. प्रल्हाद मणचेकर, डॉ. पूजा कर्पे, डॉ. मिलिंद काळे, डॉ. सुरेखा काळे, डॉ. सोनाली सावंत, डॉ. दिपाली देसाई, डॉ. राखी माधव, सौ लीनेस क्लब च्या हेमा गावसकर, शिवराम आरोलकर, चित्रा प्रभूखानोलकर
आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात योग आणि ध्यान, फिटनेस प्रशिक्षण, पोषण मार्गदर्शन याबाबत संतोष गावडे, ऍड. सुषमा खानोलकर, साक्षी बोवलेकर, केशव नवाथे, सिद्धार्थ रेगे आदिनी प्रात्यक्षिकसह विस्तृत मार्गदर्शन केले.
साक्षी बोवलेकर यांनी योग आणि शरीर लवचिकता विषयावर, सिद्धार्थ रेगे यांनी पुनर्वसन व दुखापत प्रतिबंध, फिटनेस व्यवस्थापन या विषयावर
सुषमा प्रभूखानोलकर यांनी भजन, नामस्मरण आणि मन : शांती या विषयावर, संतोष गावडे यांनी हास्य महत्व, स्व संरक्षण या विषयावर आणि केशव नवाथे यांनी सायबर सिक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी सहभागीना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखविण्यात आले. या प्रेरणादायी कार्यक्रमांस शहरवासियांचा, नागरिक महिला यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रगती चव्हाण यांनी व सौ.ज्योती देसाई यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page