Headlines

‘जैवविविधता संवर्धन’ संकल्पनेवर राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा

सिंधुदुर्ग महाविद्यालयात आयोजन

मालवण (प्रतिनिधी)

कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘जैवविविधता संवर्धन’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य कैलास राबते, IQAC समन्वयक प्रा. संग्रामसिंह पवार, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक आणि डॉ. संकेत बेळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजनेच्या लक्ष्य गीताने झाली. प्रास्ताविक डॉ. सुमेधा नाईक यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक जैवविविधता तज्ज्ञ दुर्गा ठिगळे यांनी विद्यार्थ्यांना देशातील विविध अभयारण्ये, त्यांचे प्रकार आणि विशेषतः मालवण सागरी अभयारण्याची माहिती देत किनारी जैवविविधतेचे महत्त्व स्पष्ट केले. ग्रामपंचायतीमध्ये People’s Biodiversity Register (PBR) ठेवण्यात येतो. जैवविविधतेची नोंदणी कशी करावी, त्यामध्ये कोणत्या प्रकारची माहिती संकलित केली जाते, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील जैवविविधतेची नोंद करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. पर्यावरणपूरक सजावट, निर्माल्यातून आकर्षक रांगोळी आणि मातीचा गणपती बसविणे या उपक्रमांमध्ये रिद्धी काजरेकर, राहुल शिरोडकर, क्रांती पालव, भूमी परब, वैष्णवी राजाराम सावंत, वैष्णवी पांडुरंग सावंत, वेदिका परब, विशाल वडवलकर, हेमांगी चव्हाण, रिद्धी केळुस्कर, शार्दुल पावसकर, सुभक्ती सांडव, बिरू मानवर, वैभवी गावडे, देवांग तारी, कौस्तुभ खवणेकर, चिराग पाटकर आणि तन्मय नाईक या एनएसएस स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

तसेच NSS स्वयंसेवक व SYBSc विद्यार्थी स्वप्नील गोसावी यांचा सर्प संवर्धन आणि निसर्गशाळा या उपक्रमातील कार्याबद्दल दुर्गा ठिगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एनसीसीची विद्यार्थिनी रूपाली करंगुटकर हिने राष्ट्रीय स्तरावरील रायफल शूटिंग स्पर्धेत प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी एनएसएस स्वयंसेवकांचे पाच गट करून महाविद्यालयाच्या परिसरातील विविध वनस्पती, झुडुपे, कीटक आणि इतर जैविक घटकांचे निरीक्षण करून त्यांच्या ५१ प्रजातींची नोंद करण्यात आली. या निरीक्षणावर मार्गदर्शक दुर्गा ठिगळे यांनी विश्लेषण करत कौतुक केले.

प्रा. अनघा टिकले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. संकेत बेळेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास स्टाफ सेक्रेटरी डॉ. देविदास हारगिले, एनसीसी ऑफिसर डॉ. मल्लेश खोत तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. अनघा टिकले, प्रा. योगिता सावंत, डॉ. संकेत बेळेकर, गौतम मानवर, हर्षद पाटकर, रिद्धी काजरेकर, हेमांगी चव्हाण, क्रांती पालव, पार्थ तावडे, सोहम भोगले, सानिका भोगावकर, राधाकृष्ण मालंडकर, अमितकुमार यादव, सिद्धी काजरेकर आणि शार्दुल पावसकर या संयोजन समितीने परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page