कत्तलीसाठी रेड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला पकडले…

सातोळी तिठा येथे जिल्हा वाहतूक पोलीस शाखेची कारवाई:आजरा येथील एकाला घेतले ताब्यात…

⚡सावंतवाडी ता.१८-: येथील सातोळी तिठा येथे टेम्पो मधून रेड्यांची वाहतूक करताना आजरा येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा वाहतूक शाखेकडून काल रात्री करण्यात आली आली आहे. फरान अबुबककर खेडेकर वय (२२) रा आजरा असे संशयीताचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की येथील कुडाळ ते आजरा सातोळी येथे एक बलेरो टेम्पो संशयास्पदरित्या वाटू लागल्याने जिल्हा वाहतूक शाखेकडून थांबवण्यात आला. यावेळी टेम्पोच्या हाउद्या मध्ये एकूण सहा रेडे दिसून आले. याबाबत संशयित चालकाला विचारण्यात आले असता आपण आजरा वडगाव येथील बाजारात विकण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. परंतु त्याच्याकडे कोणतेही परवाने व इतर कोणतेही कागदपत्र नसल्याने सदर जनावरे कत्तलीसाठीच घेऊन जात असल्याचा संशय आल्याने त्याच्यावर कारवाई करून तब्बल चार लाख 77 हजार चा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस प्रवीण सापळे, अमोल धुरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

You cannot copy content of this page