Headlines

नीट उत्तीर्ण ज्ञानेश नाईकला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची २० हजारांची मदत…

पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी धनादेश; संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा..

⚡सावंतवाडी, ता. २९-: नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी पुणे येथील लोकमान्य होमिओपॅथी एसएमसी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या ज्ञानेश गणेश नाईक याला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने २० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

ज्ञानेश हा अतिशय हुशार व होतकरू विद्यार्थी असून त्याला शिक्षणाची मोठी आवड आहे. मात्र, पुढील शिक्षणासाठी आर्थिक अडचण निर्माण झाल्याने त्याने सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे व सदस्या शरदिनी बागवे यांच्याशी संपर्क साधला. त्याची परिस्थिती लक्षात घेऊन शरदिनी बागवे यांनी वैयक्तिकरित्या १० हजार रुपये, तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने १० हजार रुपये अशी एकूण २० हजार रुपयांची मदत धनादेशाद्वारे केली.

यावेळी ज्ञानेशला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे, हेलन निबरे, समीता बागवे, शरदिनी बागवे, रवी जाधव, ज्ञानेश नाईक तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा दवळी उपस्थित होत्या.

You cannot copy content of this page