⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली दाभोलकरवाडी येथील रहिवासी, हॉटेल व्यावसायिक व सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ आवेरा मधील स्त्री कलावंत सिताराम ( चंदू ) लवू मिशाळे (वय 57) यांचे सोमवार दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी निधन झाले. ते चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याने त्यांना ग्रामस्थांनी उपचारासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मयत घोषित केले. याबाबत दाभोली उपसरपंच श्रीकृष्ण रामदास बांदवलकर यांनी वेंगुर्ला पोलीस स्थानकात खबर दिली आहे. त्यानुसार वेंगुर्ला पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, बहिण, भावजय असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने वेंगुर्ला तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार दिपा मठकर या अधिक तपास करीत आहेत. वायंगणी पंचायत समिती सदस्य शितल राऊत यांचे ते मामा होत.

