लवकरच कोकणासाठी वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण केला जाणार…

मंत्री दिपक केसरकर:मच्छिमार, फलोत्पादन, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, पर्यटन गोष्टीवर स्वतंत्र कंपनी स्थापन करणार…

⚡सावंतवाडी ता.१८-: कोकणावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून लवकरच कोकणासाठी वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण केला जाणार आहे यामध्ये मच्छिमार, फलोत्पादन, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, पर्यटन या सर्वच गोष्टीची स्वतंत्र कंपनी स्थापन करून विकास साध्य केला जाणार असून मुख्यमंत्र्यांचे हे पाऊल निश्चितच कायापालट करेल असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला.

तर यावर्षीचा नेव्ही डे हा सिंधुदुर्ग किल्ल्यावर डिसेंबर मध्ये होत आहे त्यासाठी देशाचे पंतप्रधान स्वतः उपस्थित राहणार असल्याने हा जिल्ह्यासाठी मान उंचावणारा दिवस असेल असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.
मंत्री केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी गणेशोत्सवाच्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले महाराष्ट्रातील सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून विविध धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून घेतले आहेत. गणेश चतुर्थीला आनंदाचा शिधा घरोघरी पोहोचविण्याचे काम राज्य शासनाने केले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या चेहऱ्यावर एक प्रकारे आनंद आहे, गणेश चतुर्थीच्या आनंदाचा सण असल्याने सरकारने टोल माफीचा निर्णय घेतला आहे दुसरीकडे गणपतीच्या कारागिरांना मोफत शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली आहे मुंबई पुणे येथील मोठ्या गणपती मंडळांसाठी फायर फायटर उपलब्ध करून देण्यात आले आहे विजेच्या दरात सवल देण्यात आली आहे ज्या ज्या मागण्या सार्वजनिक मंडळाकडून आले आहेत त्या त्याबाबत सरकारकडून निर्णय घेण्यात आले आहेत शासनाच्या महिला मंडळ विभागात काम करणाऱ्या महिलांच्या पगारात दुप्पट वाढ करण्यात आली आहे बचत गटांचे भाग भांडवल वाढवण्यात आले आहे शिक्षक सेवकांचा पगार वाढवण्यात आला आहे ग्रंथपाल त्यांच्याही पगारात वाढ करण्यात आली आहे एकूणच सर्वसामान्य बद्दल सहानुभूती असलेल्या हे सरकार असून यापुढेही सर्वसामान्यांसाठी सरकारच्या माध्यमातून काम केले जाणार आहे.
ते पुढे म्हणाले, कोकणातील मच्छीमारांच्या डिझेलच्या कर्तव्याची रक्कम दिली जात आहे विमा कंपन्यांकडून होणाऱ्या दिरंगाईवर शासनाचा लक्ष आहे काजू पिकाबाबत वेगळं धोरण अंमलात आल्याने कोकणातील काजू बागायतदारांना याचा विशेष फायदा होणार आहे. हे सर्व करत असतानाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी कोकणासाठी वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे यामध्ये मच्छीमार फलोत्पादन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट पर्यटन या सर्व गोष्टींची वेगळी कंपनीत निर्माण करून विकास साध्य केला जाणार आहे. त्यामुळे कोकणात विकासात्मक घोडदौड पाहायला मिळणार आहे. यावर्षीचा नेव्ही डे सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणार आहे त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत याच किल्ल्यावर छत्रपती महाराजांचा पुतळाही उभारला जाणार आहे तो व्हावा यासाठी जमीन मालकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे मात्र नेव्ही डे जिल्ह्यात होणे आणि पंतप्रधान या ठिकाणी येणे हा सिंधुदुर्ग वासियांसाठी मान उंचावणारा क्षण असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता तीन-तीन मंत्री व एक केंद्रीय मंत्री पद जिल्हाला मिळाले आहे या माध्यमातून विकासाची गंगा जिल्ह्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू असून सावंतवाडी शहरात येत्या सहा महिन्यात कायापालट पाहायला मिळेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बरोबरच विविध प्रकल्प सावंतवाडीत उभारले जाणार आहेत गणेश चतुर्थीच्या धामधुमेचा जिल्ह्यात साथीचे रोख फैलावत आहेत याबाबत संबंधित यंत्रणेला आवश्यकता सूचना दिले आहेत लवकरच आपण जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेणार असून योग्य त्या सूचना करणार आहे.

चौकट

जिल्ह्यातील डीएड बीड धारक विद्यार्थ्यांचा विचार करता या ठिकाणी एकाच भागासाठी वेगळा निर्णय घेता येत नाही पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी तब्बल दोन लाख 25 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत त्यातील तीस हजार विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे बाकीचे विद्यार्थी वंचित राहणार अशा विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारे संद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील डीएड बीएड धारकांनाही निश्चितच न्याय दिला जाईल असे आश्वासन मंत्री केसरकार यांनी दिले.

You cannot copy content of this page