जिल्ह्यातील पवित्र माती अमृत कलशात गोळा करावी…

राजन तेली: भाजप जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात माझी माती माझा देश कार्यक्रम संपन्न..

बांदा/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वातंत्र्य सैनिकांचा जिल्हा आहे. ही विरांची माती असून ‘माझी माती माझा देश’ या उपक्रमाअंतर्गत येथील मंदिर व नद्यांची पवित्र माती ही दिल्लीतील अमृत वाटीकेत नेण्यात येणार आहे. यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला प्रभागात फिरून ही माती अमृत कलशात गोल्स करावी असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी येथे केले.
भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने येथील ग्रामपंचायत कार्यालयात माझी माती माझा देश कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना श्री तेली बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हा अध्यक्ष श्वेता कोरगावकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली, माजी महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, महिला जिल्हा चिटणीस दीप्ती पडते, जिल्हा समन्वयक अंजली साळवी, एकनाथ नाडकर्णी, बांदा सरपंच प्रियांका नाईक, मानसी धुरी, रुपाली शिरसाट, दीपलक्ष्मी सावंत, तनुजा वराडकर, श्रेया केसरकर, मोहिनी मडगावकर, बांदा महिला शहर अध्यक्ष अवंती पंडित, रेश्मा सावंत, बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, बाळा आकेरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोप उपक्रमाअंतर्गत माझी माती माझा देश या मोहिमेअंतर्गत अमृत कलशामध्ये माती गोळा करण्यासाठी अमृत कलश यात्रा काढण्यात येत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात बांदा येथून करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते कलशात माती भरण्यात आली.
यावेळी शहरातील सर्व प्रभागात भाजपा पदाधिकारी यांनी फिरून अमृत कलशामध्ये माती गोळा केली. ही माती नवी दिल्ली येथे वीर जवानांसाठी उभारण्यात येणाऱ्या अमृत वाटीकेत पाठविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे देश भावना जागृत होत असून हे अभिमानास्पद असल्याचे महिला प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली शिरसाट यांनी केले.

You cannot copy content of this page