सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या
विद्यार्थीनीची विभागस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड …

⚡सावंतवाडी ता.१७-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा मंगळवार दि. १३. ०९ . २० २३ रोजी कनेरी हायस्कूल , कणकवली येथे शालेय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये १४ वर्षाखालील विद्यार्थी गटात सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु . अनम शब्बीर खान या विद्यार्थीनींची विभागस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी वैयक्तिकरित्या निवड करण्यात आली . या विद्यार्थिनीला प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका श्रीम. मारिया आल्मेडा यांनी मार्गदर्शन केले .

सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ , पर्यवेक्षिका श्रीम. मारिया पिंटो सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी यांनी कु . अनम खान हिचे अभिनंदन केले व रत्नागिरी येथे होणाऱ्या पुढील विभागस्तरीय कॅरमस्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .

You cannot copy content of this page