Headlines

सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

⚡सावंतवाडी ता.१९-: भारताचे माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याच्या प्रतिमेस पुष्पांजली व आदरांजली वहाण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर ,शहर अध्यक्ष ऍड. श्री राघवेंद्र नार्वेकर, माया चिटणीस ,सुमेधा सावंत ,राज पेडणेकर,समीर भाट,प्रदिप चौगुले,जगदिश धोंड, बाळासाहेब नंदीहळ्ळीआणि इतर पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते.

Read More

सत्यविजय भिसे मित्रमंडळातर्फे २२ नोव्हेबरला रक्तदान शिबीर

⚡कणकवली ता.१९-: कणकवली तालुक्यातील शिवडाव येथील कै. सत्यविजय भिसे यांच्या २१ व्या स्मृतिदिन कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळातर्फे बुधवार २२ नोव्हेबरला सकाळी ९ वा. शिवडाव राऊतखोलधाडी येथील माजी जि. प. सदस्य बाळा भिसे यांच्या निवासस्थानी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सकाळी ९ वा. सत्यविजय भिसे यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असून सकाळी ९ ते १ यावेळेत रक्तदान…

Read More

वेंगुर्ला खरेदी विक्री संघाच्या खत दुकानाला आग : हजारोंचे नुकसान…

⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला खरेदी विक्री संघ इमारतीच्या खाली असलेल्या खत दुकानाला आज रविवारी पहाटे 4.30 वाजता वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये दुकानातील साहित्य जळून खाक होऊन हजारोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान जागरूक नागरिकांनी आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला. नंतर वेंगुर्ला नगरपरिषदचा अग्निशमन बंब आल्यानंतर पूर्ण आग विझविण्यात आली. दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही…

Read More

मळगाव येथील पुरोहित आबा भटजी यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.१९-: मळगाव येथील पुरोहित वामन पुरुषोत्तम जोशी उर्फ आबा भटजी (७२) यांचे आज पहाटे निधन झाले. सोनुर्ली मळगावच्या देवस्थानात ते मानकरी होते. आबा भटजी यांना संगीत व भजनाची भरपूर आवड होती. कशी जाऊ मी वृंदावना ही त्यांची अतिशय आवडती गौळण होती. काही नाटकांमध्येही त्यांनी विविध भूमिका केल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मळगाव परिसरात हळहळ व्यक्त…

Read More

बालकुमार साहित्य- कला संमेलन अध्यक्षपदी कवी अजय कांडर…

प्राचार्य डॉ.सुशीलकुमार शिवलकर यांच्या हस्ते उद्घघाटन.. ⚡कणकवली ता.१९-: मुलांना शालेय जीवनातच साहित्य कला संस्कृती आदी संदर्भात आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या उपजत गुणांना प्रेरणा मिळावी यासाठी राजे प्रतिष्ठान सिंधू आणि ओसरगांव शाळा नं.१ च्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर महिन्यात एकदिवशीय साहित्य- कला संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ओसरगांव प्रा.शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी…

Read More

सरस्वती साईश्वरी संस्थेतर्फे गरजूंना फराळ व साहित्य वाटप…

⚡मालवण ता.१८-: श्री सरस्वती साईश्वरी संस्था, मुंबई तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही दीपावली निमित्त फराळ व साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. नाशिक येथील इगतपुरी भागात गरजूना दीपावली निमित्त नवीन कपडे, भांडी, साबण, खेळणी व फराळ वाटप करून गरजूंसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रवरा मणचेकर, प्रणव प्रमोद मणचेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी संस्था अध्यक्ष…

Read More

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय बंद आंदोलन तूर्तास स्थागित करा…

सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एस. पाटील यांची आंदोलनकर्ते यांच्याजवळ मागणी.. ⚡दोडामार्ग ता.१८-: दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यु झाल्यामुळे रुग्णसेवा सुस्थितीत येईपर्यत रुग्णालय बंद करण्याबाबत सोमवारी पुकारलेले आंदोलन तूर्तास स्थागित करा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एस. पाटील यांनी आंदोलनकर्ते लक्ष्मण सुभाष नाईक व चेतन सुभाष नाईक…

Read More

विश्वचषकातील अंतिम सामन्यासाठी घोषणाबाजी करत टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा …

सपोर्ट इंडिया अंतर्गत बांद्यातील आजी-माजी खेळाडूंचा पुढाकार… ⚡बांदा ता.१८-: सपोर्ट इंडिया अंतर्गत बांद्यातील आजी माजी क्रिकेट खेळाडूंनी उद्या होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामन्यासाठी घोषणाबाजी करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.येथील आळवाडी क्रिकेट मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी सभापती शीतल राऊळ, उपसरपंच जावेद खतीब, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, गुरुनाथ सावंत, प्रथमेश गवळी, शंकर नागझरकर,…

Read More

डांगमोडे येथील रवळनाथ मंदिरात अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ…

⚡मालवण ता.१८-: मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरात शुक्रवार पासून हरीनाम सप्ताहास सुरुवात झाली असून या सप्ताहाची सांगता २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दारू बंदीचा पुरस्कर्ता म्हणून ओळखला जाणाऱ्या डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरात प्रतिवर्षी हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते या हरीनाम सप्ताहात मालवण तालुक्यातील…

Read More

चुकून उतरलेल्या झारखंड येथील व्यक्तीच्या नातेवाईकांचा घेतला शोध…

सिंधुदुर्गनगरी पोलिसांची कामगिरी: नातेवाईकांच्या दिले ताब्यात.. ओरोस ता १८झारखंड येथील इसम सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशन येथे उतरला असता रेल्वे निघून गेल्याने तो बेवारस पणे फिरताना आढळून आल्याने सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत त्यांच्या ताब्यात दिले.16 नोव्हेंबर 2023 रोजी विजय कल्याण हेमरोम रा.कोचेडेगा, पोलीस ठाणे-बसिया इटाम गुमराह राज्य झारखंड हा मुंबई ते गोवा रेल्वेने जात असताना…

Read More
You cannot copy content of this page