⚡मालवण ता.१८-: मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरात शुक्रवार पासून हरीनाम सप्ताहास सुरुवात झाली असून या सप्ताहाची सांगता २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
दारू बंदीचा पुरस्कर्ता म्हणून ओळखला जाणाऱ्या डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिरात प्रतिवर्षी हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते या हरीनाम सप्ताहात मालवण तालुक्यातील ग्रामीण भागातील भजनी मंडळे सहभागी होत असतात. त्यामुळे हा हरीनाम सप्ताह वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. शुक्रवार पासून या हरीनाम सप्ताहास सुरुवात झाली असून त्याची सांगता २४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या अखंड हरीनाम सप्ताहाच्या निमित्ताने श्री च्या दर्शनाचा व अखंड हरीनामाचा समस्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डांगमोडे येथील समस्त ठाकूर मंडळींनी केले आहे.
