सपोर्ट इंडिया अंतर्गत बांद्यातील आजी-माजी खेळाडूंचा पुढाकार…
⚡बांदा ता.१८-: सपोर्ट इंडिया अंतर्गत बांद्यातील आजी माजी क्रिकेट खेळाडूंनी उद्या होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकातील अंतिम सामन्यासाठी घोषणाबाजी करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.
येथील आळवाडी क्रिकेट मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी सभापती शीतल राऊळ, उपसरपंच जावेद खतीब, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, गुरुनाथ सावंत, प्रथमेश गवळी, शंकर नागझरकर, पंकज निब्रे, दया आळवे, रामचंद्र सौदेकर, अभय नाईक, मधुकर देसाई, संदीप बांदेकर, प्रशांत बांदेकर आदी उपस्थित होते.
यावेळी टीम इंडियाला शुभेच्छा देत विजयी घोषणा देण्यात आल्या. उद्या टीम इंडिया अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी विजेतेपदासाठी अहमदाबाद येथे लढणार आहे.
