दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय बंद आंदोलन तूर्तास स्थागित करा…

सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एस. पाटील यांची आंदोलनकर्ते यांच्याजवळ मागणी..

⚡दोडामार्ग ता.१८-: दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यु झाल्यामुळे रुग्णसेवा सुस्थितीत येईपर्यत रुग्णालय बंद करण्याबाबत सोमवारी पुकारलेले आंदोलन तूर्तास स्थागित करा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एस. पाटील यांनी आंदोलनकर्ते लक्ष्मण सुभाष नाईक व चेतन सुभाष नाईक यांच्याजवळ केली आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे आश्वासनही डॉ. पाटील यांनी दिले

निवेदनात पाटील यांनी म्हटले की, दोडामार्ग येथे शुक्रवारी मध्यरात्री १.३० वाजता उपचारासाठी आणलेल्या महिलेला गंभीर परिस्थितीत रुग्णाला गोवा येथे पाठविले असता रुग्णाचा मृत्यु झाला. या रुग्णाचा झालेला मृत्यु ही घटना दुर्दैवी असून आपल्या निवेदनाची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची प्रशासकीय आणि तांत्रिक चौकशी त्वरीत सुरु करण्यात येणार आहे. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथील प्रभारी वैद्यकीय अधिक्षक व निवासी वैद्यकीय अधिकारी सिंधुदुर्ग डॉ. श्री. सुबोध इंगळे हे 24 नोव्हेंबर रोजी दोडामार्ग येथे प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या तकार अर्जाची सविस्तर चौकशी करतील. या मध्ये दोषी आढळणा-यां विरुध्द योग्य ती प्रशासकीय कार्यवाडी करणेत येईल. दोडामार्ग तालुक्यातील जनतेला सेवा देणारे एकमेव रुग्णालय असून तेथील सेवा बंद केल्यास रुग्णांची गैरसोय होईल, असे होऊ नये या करीता आपण सोमवारी (20 नोव्हेंबर) पुकारलेले आंदोलन स्थगित करावे, अशी मागणी केली.

You cannot copy content of this page