सरस्वती साईश्वरी संस्थेतर्फे गरजूंना फराळ व साहित्य वाटप…

⚡मालवण ता.१८-: श्री सरस्वती साईश्वरी संस्था, मुंबई तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही दीपावली निमित्त फराळ व साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. नाशिक येथील इगतपुरी भागात गरजूना दीपावली निमित्त नवीन कपडे, भांडी, साबण, खेळणी व फराळ वाटप करून गरजूंसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रवरा मणचेकर, प्रणव प्रमोद मणचेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी संस्था अध्यक्ष सुरज बांदकर, दीपेश झांजम ,लोकेश जैन, नूतन रावराणे, दत्तात्रेय पडवळ, सुजाता टिकम, नरेश करलकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page