⚡कणकवली ता.१९-: कणकवली तालुक्यातील शिवडाव येथील कै. सत्यविजय भिसे यांच्या २१ व्या स्मृतिदिन कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळातर्फे बुधवार २२ नोव्हेबरला सकाळी ९ वा. शिवडाव राऊतखोलधाडी येथील माजी जि. प. सदस्य बाळा भिसे यांच्या निवासस्थानी साजरा केला जाणार आहे.
यानिमित्त सकाळी ९ वा. सत्यविजय भिसे यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असून सकाळी ९ ते १ यावेळेत रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. तरी दात्यांनी रक्तदान करावे व स्मृतिदिन कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
