⚡सावंतवाडी ता.१९-: मळगाव येथील पुरोहित वामन पुरुषोत्तम जोशी उर्फ आबा भटजी (७२) यांचे आज पहाटे निधन झाले.
सोनुर्ली मळगावच्या देवस्थानात ते मानकरी होते. आबा भटजी यांना संगीत व भजनाची भरपूर आवड होती. कशी जाऊ मी वृंदावना ही त्यांची अतिशय आवडती गौळण होती. काही नाटकांमध्येही त्यांनी विविध भूमिका केल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे मळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, भाऊ, वहिनी, पुतणे, सुन, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
