Headlines

मळगाव देवस्थानचे मानकरी लक्ष्मण उर्फ लसी राऊळ यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.२५-: मळगाव-ब्राम्हणआळी येथील रहिवासी तथा मळगाव देवस्थानचे मानकरी लक्ष्मण उर्फ लसी डेमाजी राऊळ (७५) यांचे दीर्घ आजाराने राहत्या घरी आज दुपारी निधन झाले.मळगाव गावात ते लसी याच नावाने परिचित होते. गेली काही वर्ष ते दीर्घ आजाराने ग्रस्त होते. त्यातच गेले काही दिवस त्यांची तब्येत जास्तच खालावली. त्यातच आज त्यांचे निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार…

Read More

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी उदय दुधवडकर…

तर उपाध्यक्षपदी संजय शेळके:तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.. ⚡वैभववाडी ता.२५-: तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या नुतन अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार उदय दुधवडकर यांची तसेच उपाध्यक्ष म्हणून संजय शेळके (वैभववाडी) आणि गुरुप्रसाद सावंत तर सचिवपदी संजय खानविलकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष- उदय दुधवडकर तसेच उपाध्यक्ष म्हणून संजय शेळके (वैभववाडी) आणि गुरुप्रसाद सावंत…

Read More

वैभववाडी येथील नवलराज काळे यांना राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव पुरस्कार…

⚡वैभववाडी ता.२५-: कोल्हापूर इचलकरंजी येथे संपन्न झालेल्या शाहू महोत्सव २०२३ च्या भव्य कार्यक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैभववाडी तालुक्यातील सडुरे गावचे सुपुत्र नवलराज विजयसिंह काळे यांना माजी सामाजिक न्याय मंत्री मा.चंद्रकांत हांडोरे यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव पुरस्कार २०२३ हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी काळे यांचे वडिल विजयसिंह काळे, पत्नी…

Read More

ग्रा. पं कामगार सेना जिल्हाध्यक्षपदी पुन्हा हरिश्चंद्र आसयेकर…

⚡सावंतवाडी ता.२५-: सिंधुदूर्ग जिल्हा ग्रा. पं. कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच प्रदेशाध्यक्ष श्री.विलास कुमारवार (चंद्रपूर जिल्हा) श्री. सुनिल गेङाम (गङचिरोली )श्री. सुनिल मङवी, श्री.प्रसाद भरङे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.नरेंद्र बिङये, कुङाळ यांच्या अध्यक्षेखाली पार पाङली. यावेळी जिल्हयातील ग्रा.पं.कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे कार्याध्यक्ष -श्री.हनुमान केदार (सावंतवाङी ) ,उपाध्यक्ष श्री.नरेंद्र बिङये…

Read More

मळगाव येथील रहिवासी पिंकू राऊळ यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.२५- : मळगाव माळीचे घर येथील रहिवासी संदेश उर्फ पिंकू नामदेव राऊळ यांचे काल हृदय विकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. पिंकू राऊळ हे मळगाव पंचक्रोशीतील एक उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षक म्हणून प्रख्यात होते. मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अशा अचानक निधनाने पारिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी ,भाऊ…

Read More

हरकुळ बुद्रुक ल.गो.सामंत विद्यालय येथे श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

⚡कणकवली ता.२५-: कणकवली कॉलेज कणकवली कनिष्ठ महाविद्यालय +2 स्तर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र कणकवली कॉलेज कणकवली यांच्या वतीने दत्तक गाव हरकुळ बुद्रुक येथे समृद्ध भारतासाठी समृद्ध गाव या संकल्पनेवर आधारित निवासी श्रमसंस्कार शिबिर कणकवली कॉलेज कणकवलीने आयोजित केले होते.या शिबिराचा समारोप ल.गो. सामंत.विद्यालय हरकुळ बुद्रुक येथे…

Read More

चिरे वाहतूक करणारा ट्रक वागदे येथे महामार्गावर पलटी ; तिघे जखमी…

⚡कणकवली ता.२५-: मुंबई- गोवा महामार्गावर वागदे येथे चिरे वाहतूक करणारा आयशर ट्रक पलटी होऊन अपघात झाला.या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.अपघातानंतर महामार्गावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चिरे पसरले होते. तसेच काही काळ महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून रस्त्यावरील चिरे तसेच चिऱ्यांची पडलेली माती बाजूला करून महामार्ग वाहतुकीस…

Read More

पर्यावरणपूरक चप्पल बनविणाऱ्या श्वेता बर्वे हिचा महिला भाजपच्या वतीने सत्कार…

बांदा/प्रतिनिधीसुपारी झाडाच्या पौली (विरी) पासून पर्यावरणपूरक चप्पल बनवून तिचे पेटंट घेणाऱ्या तळकट (ता. दोडामार्ग) येथील श्वेता श्रीनिवास बर्वे हिचा सिंधुदुर्ग जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या वतीने तिच्या निवासस्थानी जाऊन जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट, रेश्मा सावंत, माजी सभापती मानसी धुरी, धनश्री बर्वे आदी उपस्थित…

Read More

विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय ठेऊन वाटचाल करणे हे गरजेचे…

शामराव काळे:बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाची सांगता.. ⚡बांदा ता.२५-: विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय ठेऊन वाटचाल करणे हे गरजेचे आहे. खेळात आणि त्यात मिळविलेल्या कौशल्याचा पुढील जीवनात कसा फायदा होतो याचा विचार विद्यार्थीदाशेतच मुलांनी केल्यास ते जग काबीज करू शकतात असे गौरवोदगार बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी येथे केले. बांदा नवभारत…

Read More

कुडाळ- मालवणमधून संजय आंग्रे लढवावी…

शिवसेना कार्यकर्त्यांची मागणी:शिवसेना संघटक रुपेश पावसकर यांची पत्रकार परिषदेत माहिती.. ⚡कुडाळ ता.२५-: आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर लढवणार आहे. त्याचप्रमाणे कुडाळ- मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी निवडणूक लढवावी अशी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे, अशी माहिती शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिली. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत…

Read More
You cannot copy content of this page