ग्रा. पं कामगार सेना जिल्हाध्यक्षपदी पुन्हा हरिश्चंद्र आसयेकर…

⚡सावंतवाडी ता.२५-: सिंधुदूर्ग जिल्हा ग्रा. पं. कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच प्रदेशाध्यक्ष श्री.विलास कुमारवार (चंद्रपूर जिल्हा) श्री. सुनिल गेङाम (गङचिरोली )श्री. सुनिल मङवी, श्री.प्रसाद भरङे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.नरेंद्र बिङये, कुङाळ यांच्या अध्यक्षेखाली पार पाङली.

यावेळी जिल्हयातील ग्रा.पं.कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे कार्याध्यक्ष -श्री.हनुमान केदार (सावंतवाङी ) ,उपाध्यक्ष श्री.नरेंद्र बिङये (कुङाळ), श्री.हेमंत तोङणकर ( कुङाळ), महिला आघाङी प्रमुख श्रीम. निता परब (वेगूर्ला ), सचिव श्रीम. वैशाली नाईक, ( वेंगूर्ला ), कोषाध्यक्ष श्री. विनोद परमेकर ( दोङामार्ग ) सहसचिव कृष्णा सावंत (सावंतवाङी ) संघटक श्री.अशोक जाधव (सावंतवाङी) सदस्य -श्री.गोविंद आसोलकर, गुरु आरोसकर,सचिन पारधी श्री.दत्तप्रसाद परब श्री.मंगेश सावंत ,श्री.गोविंद रांगणेकर श्री.छाया मेस्री,कु.विद्या पालव ,या नूतन कार्यकारणीस कर्मचार्‍यांनी शुभेच्छा दिल्या. तर प्रदेशाध्यक्ष श्री.विलासकुमार यांनी महाराष्ट राज्य ग्रामपंचायत कामगार सेना जिल्हाध्यक्ष पदी श्री.हरिश्चंद्र आसयेकर यांची निवङ झाल्याने नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले. श्री.आसयेकर यांनी यापुढे संघटना ही महाराष्ट राज्य कामगार सेनेची शाखा सिंधुदूर्ग म्हणून जिल्हयात काम करणार असून राज्यसंघटनेने जी जबाबदारी दिली ती योग्य रितीने पार पाङून जिल्हयातील ग्रा.पं.कर्मचार्‍यांच्या सेवा – शर्तीबाबत न्याय देण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासित केले.तसेच जिल्हयात कर्मचार्‍यांना एका छताखाली आणण्यासाठी तालुकास्तरावर संघटन करण्यात येईल असे सांगितले. सुत्रसंचालन श्री.हनुमान केदार यांनी केले तर आभार श्री.अशोक जाधव यांनी मांङले.नूतन कार्यकारणी मुदत 3 वर्षे पर्यंत राहील असे सभेस ठरले

You cannot copy content of this page