पर्यावरणपूरक चप्पल बनविणाऱ्या श्वेता बर्वे हिचा महिला भाजपच्या वतीने सत्कार…

बांदा/प्रतिनिधी
सुपारी झाडाच्या पौली (विरी) पासून पर्यावरणपूरक चप्पल बनवून तिचे पेटंट घेणाऱ्या तळकट (ता. दोडामार्ग) येथील श्वेता श्रीनिवास बर्वे हिचा सिंधुदुर्ग जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या वतीने तिच्या निवासस्थानी जाऊन जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट, रेश्मा सावंत, माजी सभापती मानसी धुरी, धनश्री बर्वे आदी उपस्थित होत्या. यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्वेता हिचा सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोफळीच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. श्वेता हिने पौली पासून चप्पल बनविण्याचा विचार केला. यामध्ये तिने अनेक संशोधन करत पर्यावरणपूरक चप्पल बनविले. तिने याचे पेटंट देखील मिळविले आहे. सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी देखील तिच्या कार्याचे कौतुक करत तिचा सत्कार केला आहे.
येथील सुपारी बागायतदारांकडून प्रत्येक पौली २ रुपये दराने विकत घेण्यात येते. यामुळे याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. सौ. कोरगावकर यांनी श्वेता हिच्या कार्याचे तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक केले.

You cannot copy content of this page