⚡कणकवली ता.२५-: कणकवली कॉलेज कणकवली कनिष्ठ महाविद्यालय +2 स्तर राष्ट्रीय सेवा योजना विभाग व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र कणकवली कॉलेज कणकवली यांच्या वतीने दत्तक गाव हरकुळ बुद्रुक येथे समृद्ध भारतासाठी समृद्ध गाव या संकल्पनेवर आधारित निवासी श्रमसंस्कार शिबिर कणकवली कॉलेज कणकवलीने आयोजित केले होते.
या शिबिराचा समारोप ल.गो. सामंत.विद्यालय हरकुळ बुद्रुक येथे संपन्न झाला या शिबिराच्या समारंभ प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार वळंजू ,शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त अनिल डेगवेकर ,कणकवली कॉलेज कणकवलीचे प्राचार्य युवराज महालिंगे ,हरकुल बुद्रुक सरपंच आनंद ठाकूर , मुंबई कार्यकारिणीचे
विजय सातवसे ,सुनील घाडीगावकर, मुख्याध्यापक ल.गो.सामंत विद्यालय सतीश नेवाळकर, जिल्हा समन्वयक सिंधुदुर्ग तसेच महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.के.जी जाधवर कार्यक्रमाधिकारी प्रा.विजय सावंत ,प्रा. मनोज कांबळे , सहाय्यक अधिकारी प्रा. सौ.सावंत व्ही एस ,प्रा.सौ.पी .एम. सावंत , प्रा.एस. एस .ढवळे, लिपिक वैभव राणे आदी उपस्थित होते.
या शिबिराच्या समारंभ प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विजयकुमार वळंजू यांनी भाषणात समृद्ध भारतासाठी समृद्ध गाव ,प्लास्टिक मुक्त वातावरण व जल संवर्धन ,स्वच्छ भारत अभियान ,बेटी बचाव बेटी पढाव अभियान ,नेतृत्व विकास गुण ,आणि सर्व चालू घडामोडीवर विचार व्यक्त केले.
तसेच अनिल डेगवेकर यांनी स्वयंसेवकांना व्यक्तिमत्व विकास हा प्रत्येकामध्ये रुजू झाला पाहिजे असे प्रतिपादन केले.
कणकवली कॉलेज कणकवलीचे प्र. प्राचार्य युवराज महलिंगे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. व हरकुल गावातील श्रमसंस्कार शिबिरात झालेले कार्य कौतुकास्पद झाले आहे असे विचार व्यक्त केले .महाविद्यालयाचे पर्यवेक्षक तसेच जिल्हा समन्वयक प्रा. के.जी.जाधवर यांनी स्वयंशिस्त रुजू झाली पाहिजे. असे विचार मांडले
ल.गो.सामंत विद्यालय हरकुळ बुद्रुक मुख्याध्यापक सतीश नेवाळकर यांनी जीवनात परिवर्तन घडायला पाहिजे असे सांगितले मुंबई कार्यकारिणीचे विजय सातवसे यांनी स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या, हरकुळ गावचे प्रतिष्ठित नागरिक सरपंच आनंद ठाकूर यांनी आधुनिक तंत्रज्ञान हे विकसित होत आहे असे सांगितले. या शिबिरात उल्लेखनीय काम करणाऱ्या स्वयंसेवकाचा गौरव करण्यात आला कु. मनीष जुवेकर. आदर्श स्वयंसेवक व कु. तस्निम शेख आदर्श स्वयंसेवक म्हणून निवडण्यात आले.या श्रमसंस्कार शिबिराचा अहवाल प्राध्यापक मनोज कांबळे .तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक पी.एम. सावंत यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक विजय सावंत व आभार स्वयंसेविका कुमारी साक्षी सावंत हिने मांडले.
हरकुळ बुद्रुक ल.गो.सामंत विद्यालय येथे श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
