मळगाव देवस्थानचे मानकरी लक्ष्मण उर्फ लसी राऊळ यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.२५-: मळगाव-ब्राम्हणआळी येथील रहिवासी तथा मळगाव देवस्थानचे मानकरी लक्ष्मण उर्फ लसी डेमाजी राऊळ (७५) यांचे दीर्घ आजाराने राहत्या घरी आज दुपारी निधन झाले.
मळगाव गावात ते लसी याच नावाने परिचित होते. गेली काही वर्ष ते दीर्घ आजाराने ग्रस्त होते. त्यातच गेले काही दिवस त्यांची तब्येत जास्तच खालावली. त्यातच आज त्यांचे निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन सूना, नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page