शिवसेना कार्यकर्त्यांची मागणी:शिवसेना संघटक रुपेश पावसकर यांची पत्रकार परिषदेत माहिती..
⚡कुडाळ ता.२५-: आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर लढवणार आहे. त्याचप्रमाणे कुडाळ- मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी निवडणूक लढवावी अशी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे, अशी माहिती शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी दिली. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
