सामंत बंधूंना खुश करण्यासाठी
शिंदे गटाने स्टेटमेंट देऊ नये…

पप्पू पुजारे:प्रमोद जठार खासदार हवे ही जनसामान्यांची इच्छा.. ⚡कणकवली ता.१९-: प्रमोद जठार खासदार हवे ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नव्हे तर जनसमान्यांची इच्छा आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाताची बोटे मोजण्या इतका असलेला शिंदे गटाने फक्त सामंत बंधूंना खुश करण्यासाठी स्टेटमेंट देऊ नये असा टोला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संतोष उर्फ पप्पू पुजारे यांनी लगावला आहे. भाजपा…

Read More

मुंबईत जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या वाढवाव्यात:भाई चव्हाण…

⚡कणकवली ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्हातून मुंबईत जाणार्या एसटी गाड्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे मुंबईत जा-ये करणाऱ्या प्रवाशांना खाजगी गाड्यांना भरमसाठ तिकीट मोजून प्रवास करावा लागत आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सवलती पासून वंचित रहावे लागत आहे. तरी रा. प. महामंडळाने मुंबईत जा-ये करणाऱ्या एसटी गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी प्रवाशी वर्गांकडून होत असल्याचे कोकण विकास आघाडीचे…

Read More

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेचे वादविवाद स्पर्धेत सुयश…

⚡कणकवली ता.१९-: बिडवाडी शैक्षणिक संस्था संचलित बिडवाडी हायस्कूल बिडवाडी यांच्यावतीने आयोजित केलेल्या “आधुनिक शेती तंत्रज्ञान योग्य की अयोग्य ” या वादविवाद स्पर्धेत माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेतील उच्च माध्यमिक विभागातील कु.सानिका काळसेकर (इ.११ वी सायन्स) व कु.सोनिया जाधव (इ.१२ वी वाणिज्य) यांनी सहभाग घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. या यशस्वी विद्यार्थ्यांचे कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे…

Read More

आंबोली “मधाचे गाव” लवकरच घोषित…

खादी ग्रामोद्योग महामंडळ सभापती रवींद्र साठे:विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साधा.. आंबोली,ता.१९: सिंधुदुर्गातील आंबोली गाव हे मधाचे गाव लवकरच घोषित करण्यात येणार आहे.पर्यटनाबरोबर येथील बचत गटामार्फत ग्रामीण अर्थकारण विकास झाल्यास महिलांची प्रगती, देशाची प्रगती होईल समृद्धी येईल विविध योजनांचा लाभ घ्या उमेद आणि महामंडळ मार्फत आवश्यक सहायता करण्यात येईल असे प्रतिपादन खादी ग्रामोद्योग चे सभापती(राज्यमंत्री…

Read More

असनिये घारपी ग्रामस्थांनी स्थानिक मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर दिली धडक…

असनिये घारपी रस्त्याचे कामवरून संतप्त: काम सुरू न झाल्यास २६ जानेवारी रोजी आमरण उपोषण.. ⚡सावंतवाडी ता.१९-: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नऊ महिन्यापूर्वी मंजूर झालेल्या असनिये घारपी मुख्य रस्त्याचे काम अद्यापही सुरु न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर धडक दिली. सदर रस्त्याचे काम येत्या काही दिवसात सुरु न झाल्यास…

Read More

कोकणच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात-:आम.नितेश राणे…

⚡कणकवली ता.१९-:बोले तैसा चाले असे आमचे महायुतीचे सरकार आहे. कोकणच्या विकासात हातभार लावण्यात या सरकारचे फार मोठे योगदान आहे. प्रत्येक मतदारसंघ निहाय भरपूर विकास निधी देऊन कोकणी जनतेला जे अपेक्षित आहे ते काम आमचे महायुतीचे सरकार करत आहेत. आज विधानसभेत कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाची घोषणा करून आणि त्या प्राधिकरणासाठी ५०० कोटीची तरतूद करून मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

समाजात तेढ निर्माण न होण्यासाठी सहकार्य करा…

पोलीस अधीक्षक अग्रवाल:सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे बैठकीत केले आवाहन.. ओरोस ता.१९-: समाजात वावरत असताना विविध समाज माध्यमातून छोट्या मोठ्या घडलेल्या घटनांमधून तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा घटना घडू नयेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल याची खबरदारी घेणे. समाजात गैरसमज पसरवला जाणार नाही. चुकीची माहिती पसरली जाणार नाही, याची काळजी घेवून समाज माध्यमातून मिळालेली माहिती…

Read More

जल जीवन मिशन अंतर्गत चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

दोन लाख २५ हजार रुपयांची बक्षिसे:मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांचे सहभागी होण्याचे आवाहन.. ओरोस ता.१९-: जल जीवन मिशन अंतर्गत प्राथमिक, माध्यामिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरीता जिल्हास्तरीय चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धाकरीता रक्कम रुपये 2 लाख 25 हजार रुपयांची एकूण बक्षिस जाहिर करण्यात आली आहेत. या स्पर्धामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यामिक…

Read More

पत्रकार रवी गावडे यांना मातृशोक…

ओरोस ता.१९-: कसाल वझरेवाडी येथे राहणाऱ्या सौ.लक्ष्मी नारायण गावडे (वय ८१) यांचे त्यांच्या राहत्या घरी मंगळवारी पहाटे दोन वाजता निधन झाले. त्या पत्रकार रवी गावडे यांच्या मातोश्री होत्या. तर कसाल ज्येष्ठ नागरिक संघाचे निर्माते नारायण गावडे यांच्या पत्नी होत्या.कसाल वझरेवाडी येथे राहणाऱ्या सौ लक्ष्मी गावडे यांनी बालसेविका म्हणून काम केले होते.त्यांचे पती नारायण गावडे यांनी…

Read More

रयत शिक्षण संस्थेच्या सांगलीच्या सहाय्यक विभागीय अधिकारी पदी अँथोनी डिसोझा यांची निवड…

तुळस हायस्कूल मुख्याध्यापक पदी आहेत कार्यरत:जिल्ह्यात होत आहे अभिनंदन.. वेंगुर्ले (वार्ताहर)-आशिया खंडात अग्रगण्य ४२ सिनीअर कॉलेजेस , ४५३ माध्यमिक उच्चमाध्यमिक शाळा,०७ डि.एड कॉलेज,६७ प्राथमिक शाळा,५४ इंग्लिश मिडीम व पुर्वप्राथमिक,८३ वसतिगृहे,०७ प्रशासकीय कार्यालये,०८ आश्रमशाळा,०३ ITI, इतर१२ व १ विद्यापिठ अशी एकूण ७३७ युनिट असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या (१२५ युनिट नियोजन करणाऱ्या)दक्षिण विभाग सांगलीच्या सहाय्यक विभागीय अधिकारी…

Read More
You cannot copy content of this page