Headlines

आदित्य ठाकरे यांना अंगणात बैठका घ्याव्या लागतात तर उद्धव ठाकरेंना संवाद साधावा लागतो हीच शिवसेनेची जिल्ह्यातील दूरदर्शा…

अशोक दळवी; उद्याच्या दीडशे कोटींच्या विकास कामांच्या होणाऱ्या भूमिपूजनाचे रुपेश राऊळांना मिळणार उत्तर;राजन पोकळे…

सावंतवाडी ता.०९ आदित्य ठाकरेंना अंगणात बैठका घेतल्या तर उद्धव ठाकरे आता संवाद साधतायत. त्यामुळे ठाकरे सेनेच्या पक्षाची अवस्था सिंधुदुर्गात आता काय झाली आहे ती दिसून आली आहे. त्यामुळे रुपेश राऊळ हे वैफल्यग्रस्त होऊन टीका करत आहेत, असा पलटवार शिंदे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी आज येथे केला. दरम्यान रुपेश राऊळ यांनी विधानसभेसाठी केसरकारांनी पुन्हा उभे राहण्याचे केलेले आवाहन शिंदे शिवसेना स्वीकारत असून येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून मंत्री केसरकर यांना भरघोस मतांनी निवडून आणून रुपेश राऊळ यांना चपराक देणार असा टोला देखील श्री दळवी यांनी यावेळी हाणला.ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी दळवी पुढे बोलतान म्हणाले की प्रत्येक पक्षात हे वैयक्तिक देवाण-घेवाण असते. त्यामुळे नाहक विरोधकांनी बदनामी करून बालिशपणासारखे राजीनामा देण्याची मागणी करू नये, असा टोला देखील श्री दळवी यांनी यावेळी हाणला. तर विकास कामे दीपक केसरकर यांनी पंधरा वर्षात काहीच केली नाहीत, असे रुपेश राऊळ म्हणत असतील तर उद्या होणाऱ्या दीडशे कोटींच्या कामातून रुपेश राऊळ यांना एक प्रकारे उत्तर मिळेल, असा टोला देखील माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी यावेळी लगावला.

You cannot copy content of this page