Headlines

सावंतवाडीतील टेलिफोन कॉलनीत तीन बंगले फोडले…

दागिने व दोन दुचाकी लंपास:सीसीटीव्ही बंद असल्याने तपासासमोर अडचण..

सावंतवाडी : शहराच्या सीमेवरील टेलिफोन कॉलनीतील तिनं बंगले चोरट्यांनी फोडले. काल रात्री हा प्रकार घडला. यातील काही बंगले हे बंद असल्याचा फायदा घेत फोडण्यात आलेत.

सावंतवाडी पोलीसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून अधिक तपास करत आहेत. तर फोडलेल्या एका घरातील फोन, लॅपटॉप तसाच असून बेडरूमधील कपाटे फोडून चोरीचा प्रयत्न केला आहे. तर काही ठिकाणाहून दागिने लंपास केले असुन २ दुचाकीही चोरीस गेल्यात. पोलीसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून पोलीसांचे बंद असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे पोलीसांना चोरांचा सुगावा लावण्यात मोठी अडचण येत असून प्रवाशासनाने यावर गांभीर्याने लक्ष देत तात्काळ कार्यवाहीची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

You cannot copy content of this page