मंत्री उदय सामंत: जिल्हाधिकारी यांनी केला सत्कार…
⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्गच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.ते सावंतवाडी जिमखाना मैदानावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाच्या भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी श्री.सामंत यांचा सत्कार केला.दरम्यान चौथ्या रात्री अशोक हांडे प्रस्तुत चौरंग संचलित ‘मराठी बाणा ‘ कार्यक्रम सावंतवाडीकरांसह उपस्थित जिल्हावासियांना पर्वणी ठरला.
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील हा कार्यक्रम आवर्जून पाहिला.
यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय अधिकारी श्री सोनुने, तहसीलदार श्रीधर पाटील आदी उपस्थित होते.
मराठी सण उत्सव परंपरा यांच्या कार्यक्रमाने रसिक प्रेक्षक आनंदून गेले. १५० कलावंतांच्या गीत संगित व नृत्याविष्काराच्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अशोक हांडे यांचे लेखन व संकल्पना असलेला हा गीत गायन वादन नृत्य यांचा सुरेख संगम असलेला कार्यक्रम रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. गण गवळण अभंग भारुड गोंधळ याला नृत्याचा साज चढवित केलेले सादरीकरण उपस्थित रसिकांना भावले. रसिकांनी या सर्व कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद दिला. उद्या संगितकार, गायक अवधूत गुप्ते यांच्या सदाबहार गीतांचा नजराणा सादर केला जाणार आहे.
