भूमिपूजन कार्यक्रमांचे निमंत्रण नसल्याने भाजपची कार्यक्रमाकडे पाठ…

सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांचा केला निषेध: स्वतंत्रपणे करणार भूमिपूजन..

⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी शहरात आज होत असलेल्या दीडशे कोटींच्या विकास कामांच्या भूमिपूजनाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले नसल्याने आज स भाजप तर्फे या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचे जाहीर करण्यात आले आहे.याबाबत त्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सागर साळुंखे यांचाही निषेध करण्यात आल्याचेही भाजपच्या वतीने सांगण्यात आले.दरम्यान आज शहरात होत असलेले विकास कामांची भुमिपूजन भाजप स्वतंत्रपणे करणार असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. यावेळी सर्व नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहे

You cannot copy content of this page