श्रेया वाद रंगला: विकास कामांची सेना-भाजप कडून वेगवेगळे भूमिपूजन..
सावंतवाडी ता.१०-:सावंतवाडी तालुक्यात महायुतीमध्ये बेबनाव उघड झाला असून विकास कामांच्या भूमिपूजनावरून सेना व भाजपमध्ये श्रेय वादाची लढाई दिसून आली आहे. माजगाव येथील धरणाच्या कामाची भूमिपूजन निमंत्रण नसल्याने माजी आमदार राजन तेली यांनी सकाळीच भुमिपूजन केले असताना त्यानंतर शालेय शिक्षण दीपक केसरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समावेत जात पुन्हा त्या कामाची भूमिपूजन केले. एकीकडे राज्यात शिवसेना व भाजप युती असताना सावंतवाडीत मात्र विकास कामांच्या भूमिपूजन आपापसात श्रेयवाद सुरू झाला असल्याचं उघड झाले आहे.
