रविंद्र चव्हाण; संजू परब यांचे विशेष प्रयत्न;तर मंत्री दिपक केसरकर यांच्यामुळे सावंतवाडी मतदारसंघातील विकास कामांना गती…
⚡सावंतवाडी ता.१०-: सावंतवाडी शहरातील सुधारित नळ पाणी योजनेचा प्रश्न महायुतीमुळे सुटला . हा प्रश्न सुटण्यासाठी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे मुखमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात लक्ष घालून हा प्रश्न सोडवला.असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केला.
दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील ही विकास काम होत आहेत असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यासांगितले.ते सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य विज्ञान परिषद कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थितीत दर्शवून त्यांनी शुभेच्छा दिल्या.
