Headlines

नवीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची नगराध्यक्ष व नगरसेवकांनी घेतली सदिच्छा भेट..

सावंतवाडी, ता. ४ : सावंतवाडी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची नियुक्ती झाल्यानिमित्त सावंतवाडीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
यावेळी सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील ट्रॅफिकची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार उद्या (ता. ५) सकाळी १२ वाजता सावंतवाडी नगरपालिकेच्या सभागृहात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस नवनियुक्त पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखेचे अधिकारी, एस.टी. महामंडळाचे अधिकारी, स्थानिक वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी, ऑटो रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सर्व सभापती तसेच नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत शहरातील वाहतूक कोंडीची कारणे, पार्किंग व्यवस्था, प्रमुख चौकांतील वाहतुकीचे नियोजन, रिक्षा व बस वाहतुकीचे व्यवस्थापन तसेच तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर सविस्तर चर्चा होणार असून, शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध व सुरळीत करण्यासाठी ठोस निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page