Headlines

वैभववाडी केमिस्ट असोसिएशनच्या जिल्हा प्रतिनिधीपदी संजय सावंत बिनविरोध…

⚡वैभववाडी ता.०४-: वैभववाडी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूकीत व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष वाभवे वैभववाडी न प चे नगरसेवक संजय दिगंबर सावंत यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मा.दयानंद उबाळे यांनी काम पाहिले, वैभववाडी तालुका अध्यक्षपदी विजय लोके,सचिवपदी दिनेश वळंजू यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.उपाध्यक्ष श्री.आसिफ रमदुल ,खजिनदार सौ.श्रावणी स्वामी,सहसचिव श्री.जयेंद्र कोलते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा खजिनदार श्री.विवेक आपटे,कणकवली तालुका अध्यक्ष श्री.संजय घाडी व तालुक्यातील केमिस्ट बांधव उपस्थित होते.

You cannot copy content of this page