Headlines

कुडाळ-माठेवाडा परिसरात मच्छर प्रतिबंधक फवारणी…

नगरसेवक मंदार शिरसाठ यांचा पुढाकार :नागरिकांतून समाधान व्यक्त..

कुडाळ :पावसाळी वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांच्या धोक्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी माठेवाडा परिसरात डास प्रतिबंधक (मच्छर) फवारणी मोहीम नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या माध्यमातून राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत फवारणी यंत्राच्या साहाय्याने माठेवाडा परिसरातील सर्व प्रमुख रस्ते, नाले, आणि संभाव्य डास पैदास केंद्रांच्या ठिकाणी व प्रत्येक घरोघरी फवारणी (Fogging) करण्यात आले. या वेळी नगरसेवक मंदार शिरसाठ, श्री. पिंगुळकर, मंदार चंद्रकांत शिरसाठ, दीपक भोगटे, शुभम म्हाडेश्वर, सोहम बांदेकर, संदीप पवार, श्री. शिरसाठ, संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर, अमित राणे व माठेवाडा येथील नागरिक उपस्थित होते.
पावसाळ्यात जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढू नये आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आयोजकांनी या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या घराच्या अवतीभवती कुठेही पाणी साचू देऊ नये, आठवड्यातून एकदा ‘कोरडा दिवस’ पाळावा आणि डासांपासून होणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी प्रयत्न करावे.

You cannot copy content of this page