Headlines

आंबोली घाटात अस्वछता करणाऱ्यांना दंड,…

वनविभागाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू… ⚡आंबोली ता.१८-: आंबोली धबधबा व घाट परिसरात असलेल्या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच बेधुंद पर्यटनावर चाप लावणे या उद्देशाने वन विभागाने आंबोली घाट व धबधबा परिसर या राखीव संवर्धन क्षेत्रात कचरा करणे, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे आशा निसर्ग व पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांना दंड करण्याचा पथदर्शी निर्णय…

Read More

तळकोकणातील शेतकऱ्यांना काजू बी ला हमीभाव न दिल्याने शेतकरी नाराज…

विलास सावंत:अधिवेशनात काजु बी ला प्रतिकिलो २०० रुपये हमी भाव मिळवून द्यावा; अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन.. ⚡बांदा ता.१८-: तळकोकणातील शेतकऱ्यांचे प्रमुख अर्थकारण असलेल्या काजू बी ला हमीभाव देण्यात न आल्याने शेतकरी नाराज आहेत. येत्या काही दिवसांनी सुरु होणाऱ्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात जीआय मानांकित काजु बी ला प्रतिकिलो २०० रुपये हमी भाव मिळवून द्यावा अन्यथा कोकणातील विविध…

Read More

विशाल परबांकडून जावेद खतीब यांना बकरी ईद च्या शुभेच्छा…

⚡बांदा ता.१७-: येथील भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी बकरी ईद निमित्त बांदा येथील उपसरपंच जावेद खतीब यांच्यासह परिसरात राहणाऱ्या अनेक मुस्लिम कार्यकर्ते व बांधवांची भेट घेतली. यावेळी त्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांच्यासोबत दिलीप भालेकर,केतन आजगावकर, प्रशांत पाटील, तेजस माने,आदी उपस्थित होते

Read More

संजू परबांकडून राजू बेग, जावेद खतीब यांना बकरी ईदच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१७-: येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी बकरी ईद निमित्त आज बांदा येथील उपसरपंच जावेद खतीब यांच्यासह सावंतवाडीतील माजी नगरसेवक राजू बेग यांच्या घरी भेट घेतली.यावेळी त्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांच्यासोबत विनोद सावंत, सचिन साटेलकर, सत्यवान बांदेकर, समीर पालव,आदी उपस्थित होते.

Read More

वाणिज्य शाखेत बोर्डात आलेल्या रिद्धी तळगावकर हीचा सत्कार…

एस के बॉयज सुतारवाडी – काळसेवाडी यांनी केला सन्मान.. बांदा/प्रतिनिधीयेथील एस. के. बॉयज सुतारवाडी- काळसेवाडी यांच्यावतीने बारावी परीक्षेत कोकण बोर्ड मध्ये वाणिज्य शाखेमध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल रिद्धी तळगावकर हिचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी एस. के. बॉयजचे शुभम बांदेकर, जे. डी. पाटील, अनुज बांदेकर, संकेत वेंगुर्लेकर, परेश कोचरेकर, नारायण बांदेकर, अक्षय…

Read More

छ. शिवाजी महाराज यांच्या सोबत महत्वाची भूमिका बजावणारे भंडारी होते…

अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर:कट्टा येथे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.. मालवण दि प्रतिनिधी : स्वराज्याचे तोरण बांधताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत महत्वाची भूमिका बजावणारे हे भंडारी होते. भंडारी समाजाला खूप मोठा इतिहास आहे. मायनाक भंडारी आणि भागोजीशेठ कीर हे भंडारी समाजाचे खूप मोठे नेते होऊन गेले. त्यांनी आपल्या समाजाला मोठी ओळख निर्माण करून दिली. त्यांचे…

Read More

तेली समाज उन्नती मंडळ मालवणची वार्षिक सभा संपन्न…

⚡मालवण ता.१७-:तेली समाज उन्नती मंडळ मालवण या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मालवणातील भंडारी हायस्कूलमध्ये मंडळाचे अध्यक्ष राजन आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभेचे कामकाज पार पाडत मंडळाच्या पुढील वाटचालीची रूपरेषा आखण्यात आली. यावेळी मंडळाचे सचिव श्री. शेर्लेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. सन २०२३- २०२४ चा वार्षिक अहवाल सभेपुढे सादर करण्यात आला. मागील…

Read More

‘शिवसंस्कार’तर्फे भव्य आंतरराज्य दुर्ग फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१७-: छत्रपती शिवरायांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा शक पूर्ण होऊन ३५१ वे शक प्रारंभ होत आहे. दुर्गदुर्गेश्वर रायगडावर दि. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला दि.२० जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलेल्या दूरदृष्टीचं द्योतक म्हणजे गड किल्ले!! ज्याच्या ताब्यात गड त्याची त्या प्रदेशावर सत्ता हे मर्म ओळखूनच महाराजांनी गडावर राहूनच स्वराज्य उभारणी ,…

Read More

शास्त्रीय गायन व हार्मोनियम वादन परीक्षेत भंडारी प्राथमिक शाळेचा निकाल १०० टक्के…

⚡मालवण ता.१७-: अखिल भारतीय गांधर्व मंडळ मुंबई आयोजित शास्त्रीय गायन तसेच हार्मोनियम वादन परीक्षेत मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या शाळेतून परीक्षेस प्रविष्ठ झालेले सर्व १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात १२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. भंडारी एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या विविध विभागांमध्ये अनेक नाविन्यपूर्ण आणि…

Read More

मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्यातर्फे महिलांसाठी मोफत अक्कलकोट दर्शन…

⚡मालवण ता.१७-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष श्री. गणेश वाईरकर हे जुलै महिन्यात मालवण तालुक्यातील महिलांना मोफत अक्कलकोट दर्शन घडवणार आहेत. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे पक्षाला घवघवीत यश मिळून राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना स्वामी चरणी करण्यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीत मालवण…

Read More
You cannot copy content of this page