⚡वैभववाडी ता.२८-: करूळ गावठाण अ येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम वय 70 वर्षे यांचा मृतदेह घटनास्थळापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर नदीपात्रातील झुडपामध्ये सापडून आला. करूळ एडगाव सीमेजवळ जांभळीचा माळ या ठिकाणी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास तब्बल आठ तासाने सापडून आला. सकाळी नऊ वाजल्यापासून सह्याद्री जीव रक्षक टीमचे हेमंत पाटील, नरेंद्र कोलते, राजेंद्र वारंग, विजय सावंत, अमर शिंदे, रवींद्र चव्हाण, रघुनाथ चव्हाण, आनंद शिंदे, सत्यवान सरफरे संजय कदम, पांडुरंग शिवगण, सत्यविजय मोरे, विजय पवार, तुकाराम पवार, मंगेश शिवगण, हिंदुराव पाटील, सचिन पाटील, सुरज शिंदे शोधकार्य सुरू होते. करूळ ग्रामस्थ आणि सह्याद्री जीवन रक्षक यांच्या अथक प्रयत्नांना आठ तासाने यश मिळून आले आहे.
मयत सदानंद कदम हे सकाळी शेतीच्या कामाला जात असताना करूळ नदीत पाय घसरून तोल जाऊन नदीच्या प्रवाहात वाहत गेले.
याबाबत प्रशासनाला माहिती मिळताच तहसीलदार सूर्यकांत पाटील, नायब तहसीलदार दिलीप पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, वैभववाडी सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, जि. प. सदस्य मनोज रावराणे, श्रावणी रावराणे, बंड्या मांजरेकर, पं.स. सदस्य सुवर्णा संसारे, मंगेश लोके, सरपंच नरेंद्र कोलते, माजी सरपंच हिंदूराव पाटील, अरुण कदम, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब कोलते, पोलीस पाटील उदय कदम व सचिन पाटील, मंडळ अधिकारी श्री.गवस, तलाठी शुभांगी साबळे, ग्रामसेवक शशिकांत गुरव, पोलीस अधिकारी फक्रुद्दीन आगा, पोलीस हवालदार सी.ए.माने, आर.बी.तळस्कर, मोहन राणे, जितेंद्र कोलते, संदीप राठोड उपस्थित होते.
सदानंद कदम हे करूळ गावचे प्रसिद्ध व्यापारी होते तसेच ते उत्तम शेतकरी होते अनेक वर्षे ते शेतीबरोबर व्यापारी व्यवसाय करत असत त्यांच्या पश्चात दोन मुली दोन मुलगे भाऊ भावजय जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.
करूळ नदीत वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आठ तासांच्या शोधानंतर सापडला…
