Headlines

खरीप हंगामात केवळ एक रुपयात पीक विमा योजनेत सहभागी व्हा…

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांचे आवाहन.. ⚡ओरोस ता १९-: नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतक-यांना आर्थिक आधार मिळावा याकरीता येणा-या प्रधानमंत्री पीक योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतक-यांना पेरणी न होणे तसेच पुर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे…

Read More

मराठा समाजाच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही…

मंत्री केसरकर:जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल.. ⚡सावंतवाडी ता.१९-: सकल मराठा समाजाच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही,ई डब्ल्यू एस दाखल्या बाबत जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून ते वितरीत करण्याच्या सूचना तहसिलदार यांना देण्यात येतील असे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांच्याशी भ्रमणध्वनी वरुन बोलताना सांगितले.सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील…

Read More

सावंतवाडी तहसीलदारांचे प्रवेशद्वार बनले मृत्यूचा सापळा…

सुरेश भोगटे: सडलेले गेट तात्काळ बदला; अन्यथा घाटकोपर सारखा प्रसंग होईल.. ⚡सावंतवाडी ता.१९-: येथील सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील गेट पूर्ण सडलेले आहे कधीही कोसळू शकते तसेच त्या खालून अनेक नागरिकांची अधिकाऱ्यांची ये जा वर्दळ चालू असते त्यामुळे ते गेट तात्काळ बदलण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी आज केली.दरम्यान माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी…

Read More

मुंगूसाला वाचविण्याच्या नादात दुचाकीचा भीषण अपघात…

ओरोस येथील घटना: दुचाकीस्वार गंभीर जखमी.. ⚡ओरोस ता.१९-: मुंबई गोवा महामार्गावर ओरोस येथे दुचाकीचा भीषण अपघात झाला असून मुंगूस या प्राण्याला वाचविताना भरधाव दुचाकीचा अपघात घडला यात दुचाकीस्वार गंभीर,झाला असून त्याला उपचारासाठी नागरिकांनी ओरोस रुग्णालयात हलविले.दरम्यान हा अपघात ओरोस जिजामाता चौक नजीक घडला.

Read More

कुणकेश्वर समुद्रकिनारी ३०० सुरुंच्या रोपाची लागवड…

महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक समिती व कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या संयुक्त उपक्रम.. ⚡देवगड ता.१९-:पुरोगामी महाराष्ट्र शिक्षक समिती व कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानेच्या वतीने कुणकेश्वर येथे वृक्षारोपण करण्यात आले. कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने या सुरूच्या रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमाचा शुभारंभ देवगड पंचायत समिती गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता कुणकेश्वर बीच येथे…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१९-: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या (सीबीएसई बोर्ड) विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये ए वन श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या आर्यन हिर्लेकर, ऋतुजा गावडे, ऋषी लेले, तन्मय कुमार, शौनक नर, स्वरांगी आंगचेकर, विराज सावंत, जान्हवी देसाई या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी तसेच पालक वर्ग…

Read More

वेंगुर्ला भाजपातर्फे योग शिबिराचे आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.१९-: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वेंगुर्ला भाजपातर्फे शुक्रवार दि. २१ जून रोजी वेंगुर्ला कॅम्प मैदानावर तालुका क्रिडा केंद्रातील नविन बॅडमिटंन हॉलमध्ये सकाळी ७ ते ८ या वेळेत योग शिबिर आयोजित केले आहे. याबाबत वेंगुर्ला भाजपा कार्यालयात नियोजन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत कार्यक्रमाचे संयोजन म्हणून माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व…

Read More

आंबोलीत दुचाकी आणि पिकअप अपघातातील दुसऱ्याही युवकाचा मृत्यू…

⚡आंबोली ता.१८-: आंबोली येथे दुपारी बलेरो पिकप व दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या युवकाचे रात्री उशिरा बेळगाव येथे उपचारादरम्यान निधन झालं.

Read More

आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळ कोल्हापूर व बांदा पर्यटात मारामारी…

⚡आंबोली,ता.१८-: आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळ कोल्हापूर येथील पर्यटक आणि बांदा येथील पर्यटकात मारामारी झाली. यात दोन्ही बाजूनी एकमेकांना मारामारी झाल्यानंतर कोल्हापूर येथील पर्यटक घाटातील काडयांवर चडून पळाल्याची घटना घडली. दरम्यान उशिरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी हजर होते. याबाबत अधिक वृत्त असे,आंबोली येथे मंगळवारी संध्याकाळी ७ च्या दरम्यान कोल्हापूर आणि बांदा येथील पर्यटक यांच्यात बाचा…

Read More

नॅशनल लेव्हल अबॅकस परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनच घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.१८-: मराठा समाज हॉल- पडतेवाडी, कुडाळ येथे घेतलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. या परीक्षेत इयत्ता पहिली मधील, कु. नित्या धुरी हिने प्रथम क्रमांक, कु. मिहिरा खटावकर हिने तृतीय क्रमांक, कु. भावेश कोठावळे व कु. नुरवी श्रृंगारे यांनी चौथा क्रमांक तर कु. समर्थ देसाई याने पाचवा…

Read More
You cannot copy content of this page