Headlines

वाचन संस्कृती जपा, सकारात्मक विचार जोपासा…

जयप्रकाश परब :पाट हायस्कुलमध्ये गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न..

⚡कुडाळ ता.२८-: विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणाऱ्या शिक्षकांचे योगदान अमूल्य आहे. वाचन संस्कृती जपण्यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. सकारात्मक आणि विधायक विचारच यशस्वी आयुष्याचा पाया ठरतात,” असा प्रेरणादायी संदेश सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब विद्यार्थ्यांना दिला. एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट पंचक्रोशी संचलित एस. एल. देसाई विद्यालय व कै. सौ. एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक गुणगौरव समारंभ जयप्रकाश परब यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
कै. सुहासिनी रामचंद्र ठाकूर स्मृतिदिन व कै. श्री. रामचंद्र निळकंठ ठाकूर स्मृती पारितोषिक वितरण समारंभाचे औचित्य साधून प्रशालेतील विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कै. सौ. सुहासिनी रामचंद्र ठाकूर यांच्या कार्याचा आढावा ज्येष्ठ शिक्षिका दीपिका सामंत यांनी आपल्या ओघवत्या शैलीत मांडला. संस्थेचे सदस्य राजेश सामंत यांनी, संस्थेकडून दरवर्षी सुमारे सव्वा लाख रुपयांची पारितोषिके विविध दानशूर व्यक्ती आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना प्रदान केली जातात, असे सांगितले. संस्था सचिव विजय ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागील एकाग्रतेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी जयप्रकाश परब यांचा परिचय शिक्षक प्रतिनिधी संदीप साळसकर यांनी करून दिला. यावेळी बोलताना जयप्रकाश परब यांनी विद्यार्थ्यांना यशाच्या प्रवासात साथ देणाऱ्या पालकांचे विशेष अभिनंदन केले. मुख्याध्यापक सयाजी बोंदर यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
समारंभात मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके पुढील प्रमाणे देण्यात आली. कै. सौ सुहासिनी रामचंद्र ठाकूर स्मृती पारितोषिके – इयत्ता पाचवी ते नववी मधील 2025- 26 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेतील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी 1) इयत्ता पाचवी- मीरा महादेव सामंत 2)इयत्ता सहावी- विरा वरद रेवंडकर 3)इयत्ता सातवी -भक्ती योगेश तेली कोचरेकर 4)इयत्ता आठवी- आर्यन अनिल परब 5) इयत्ता नववी -मिहीर विजय मेस्त्री.
कै. श्री.रामचंद्र निळकंठ ठाकूर स्मृती पारितोषिके- सन 2025 -26 मध्ये इयत्ता दहावी ,अकरावी -विज्ञान, वाणिज्य , कला,बारावी- विज्ञान ,वाणिज्य ,कला प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी पुढील प्रमाणे इयत्ता- दहावी दिया निलेश सामंत, इयत्ता- अकरावी -विज्ञान दर्शन सुंदर सामंत ,इयत्ता अकरावी- वाणिज्य मनस्वी दादू रावले, इयत्ता अकरावी कला -भाग्यश्री जनार्दन माधव ,इयत्ता बारावी- विज्ञान अर्पिता अमेय सामंत, इयत्ता बारावी वाणिज्य- अथर्व उत्तम पाटकर ,इयत्ता बारावी -कला प्रियांका गोविंद आरोलकर .
तसेच सन 2025 -26 इयत्ता दहावी मधील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे- प्रथम क्रमांक- दिया निलेश सामंत, द्वितीय क्रमांक -शिवानी मंगेश सर्वेकर ,तृतीय क्रमांक- सौमित्र सुधीर मळेकर, तृतीय क्रमांक- शुभंकर संदेश नाईक, तसेच 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे विद्यार्थी- वैभवी नारायण केळुसकर,स्वयम अमृत महाडिक, वैदेही मंगेश अवसरे ,वेदिका सतीश नार्वेकर, बाळकृष्ण प्रसाद रावले ,सिया सतीश मयेकर, प्राजक्ता प्रदीप दाभोलकर ,चैतन्या राजेश कोळंबकर. एन्. एम्. एम्. एस्. परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे महेश्वरी गिरीप्रसाद राऊळ, हरी विकास नार्वेकर, वेदांती लक्ष्मण दाभोलकर, दीक्षांत उमेश कोरगावकर.
इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थी (उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती- परीक्षा) प्रथम क्रमांक मीरा महादेव सामंत, द्वितीय क्रमांक स्पृहा संदेश नाईक इयत्ता आठवी शिष्यवृत्ती -परीक्षा'( पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा) प्रथम क्रमांक आर्यन अनिल परब ,द्वितीय क्रमांक महेश्वरी गिरीप्रसाद राऊळ.
सन 2025 -26 मध्ये घेण्यात आलेल्या एच. एस्. सी परीक्षेतील प्रथम तीन क्रमांक विज्ञान शाखा- प्रथम क्रमांक अर्पिता अमेय सामंत, द्वितीय क्रमांक दीक्षा शंकर परब, तृतीय क्रमांक शाल्मली शंकर घोगळे ,वाणिज्य शाखा- प्रथम क्रमांक अथर्व उत्तम पाटकर ,द्वितीय क्रमांक रिया राजन पाटकर, तृतीय क्रमांक वैभव वासुदेव वझरकर ,कला शाखा- प्रथम क्रमांक प्रियांका गोविंद आरोलकर, द्वितीय क्रमांक वेदश्री ज्ञानेश्वर परब, तृतीय क्रमांक लाडू मधुकर पाटील या सर्व विद्यार्थ्यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व गुलाबपुष्प देऊन प्रशाला व संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष दिगंबर सामंत होते. व्यासपीठावर कार्याध्यक्ष देवदत्त साळगांवकर, संस्था सचिव विजय ठाकूर, राजेश सामंत, नारायण तळावडेकर, महेश ठाकूर, मुख्याध्यापक सयाजी बोंदर, पर्यवेक्षिका अंकिता मोडक, शिक्षक प्रतिनिधी संदीप साळसकर तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक सयाजी बोंदर यांनी केले. सूत्रसंचालन जान्हवी पडते यांनी केले, पारितोषिकांचे वाचन नंदिनी बुरुड यांनी केले, तर आभार पर्यवेक्षिका अंकिता मोडक यांनी मानले.

You cannot copy content of this page