वेंगुर्ला भाजपातर्फे योग शिबिराचे आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.१९-: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत वेंगुर्ला भाजपातर्फे शुक्रवार दि. २१ जून रोजी वेंगुर्ला कॅम्प मैदानावर तालुका क्रिडा केंद्रातील नविन बॅडमिटंन हॉलमध्ये सकाळी ७ ते ८ या वेळेत योग शिबिर आयोजित केले आहे. याबाबत वेंगुर्ला भाजपा कार्यालयात नियोजन बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत कार्यक्रमाचे संयोजन म्हणून माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व सहसंयोजक म्हणून अॅड. सुषमा प्रभूखानोलकर यांची निवड करण्यात आली. या शिबिरात भाजपा कार्यकर्त्यांसोबत खेळाडू, डॉक्टर, वकिल, प्राध्यापक, शिक्षक तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहे. नागरिकांनीही यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page