⚡आंबोली,ता.१८-: आंबोली घाटातील मुख्य धबधब्याजवळ कोल्हापूर येथील पर्यटक आणि बांदा येथील पर्यटकात मारामारी झाली. यात दोन्ही बाजूनी एकमेकांना मारामारी झाल्यानंतर कोल्हापूर येथील पर्यटक घाटातील काडयांवर चडून पळाल्याची घटना घडली.
दरम्यान उशिरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी हजर होते. याबाबत अधिक वृत्त असे,आंबोली येथे मंगळवारी संध्याकाळी ७ च्या दरम्यान कोल्हापूर आणि बांदा येथील पर्यटक यांच्यात बाचा बाची झाली.यात कोल्हापूर चे ७ ते८ जन होते त्यांनी बांदा येथील तिघांना मारहाण केली.मात्र त्यांनी इतर साथीदारांना बोलावले काही वेळातच साधारण तिसच्या आसपास जमा झाले आणि मारहाण करणाऱ्या कोल्हापूर येथील पर्यटकांना वचपा काढला.यावेळी मारामारी मुळे कोल्हापूर येथील पर्यटकांनी घाटातील धबधब्याजवळील कठडे चडून पळून गेल्याची माहिती काही पर्यटकांनी दिली आहे.गाड्या तिथेच ठेवून पळून गेले. उशिरा आंबोली पोलिसात तक्रार दाखल करण्या साठी दाखल होते.मात्र तक्रार काय दाखल केली याची अधिकृत माहिती मिळाली नाही.
