मालवण (प्रतिनिधी)
मालवण मेढा येथे पहाटे सुमारास मलबारी कवड्या धनेश (Malabar Pied Hornbill) जखमी अवस्थेत भूषण परब, नागेश परब, आशिष चव्हाण, केतन केणी यांना मिळाला. नागेश परब यांनी युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेची संपर्क केला असता याची माहिती वनविभागाचे फॉरेस्टर श्री.सदानंद परब यांना देण्यात आली. इकोमेट्सचे सदस्य सागर धुरी यांनी त्या धनेश पक्षाला रेस्क्यू केले व तात्काळ प्रथमोपचार करण्यासाठी कांदळवन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्रात दाखल केले.
रीफ वॉच मरीन चे काँझर्वेशन पशुवैद्य श्री. अजू अलेक्झांडर यांनी त्या धनेश पक्षावर तातडीने उपचार केले व त्यानंतर तो पक्षी युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेमार्फत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुखरूप सुपूर्त करण्यात आला आला.
Malabar Pied Hornbill Bird या पक्ष्याला मराठीत मलबारी कवड्या धनेश असे म्हटले जाते. हा पक्षी सदाहरित आणि पानगळीच्या जंगलात आढळतो. मात्र, जंगलाजवळील लहान नागरी भागातही झाडांवर आढळतो. मलबार पाइड हॉर्नबिलचा विणीचा हंगाम एप्रिल ते जून या कालावधीत असतो. हे पक्षी आयुष्यभरासाठी एकाच जोडीदारासोबत राहतात, अशी माहिती युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या सदस्यांनी दिली.
