नॅशनल लेव्हल अबॅकस परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनच घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.१८-: मराठा समाज हॉल- पडतेवाडी, कुडाळ येथे घेतलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. या परीक्षेत इयत्ता पहिली मधील, कु. नित्या धुरी हिने प्रथम क्रमांक, कु. मिहिरा खटावकर हिने तृतीय क्रमांक, कु. भावेश कोठावळे व कु. नुरवी श्रृंगारे यांनी चौथा क्रमांक तर कु. समर्थ देसाई याने पाचवा क्रमांक पटकावला.

तसेच, इयत्ता इयत्ता पाचवी मधील कु. देवांग सारंग, कु. किमया पोटे व इयत्ता सहावी मधील कु. हिना सारंग या विद्यार्थ्यांनी उत्तेजनार्थ श्रेणी प्राप्त केली. तर, इयत्ता सहावी मधील कु. हेरंब नाटेकर याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ही श्रेणी पटकावली. या सर्व विद्यार्थ्यांनी वरील परीक्षेत गुरुश्री अकादमीचे प्रमुख भिसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले. शाळेचे संचालक श्री. ऋजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी देखील वरील परीक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page