सुरेश भोगटे: सडलेले गेट तात्काळ बदला; अन्यथा घाटकोपर सारखा प्रसंग होईल..
⚡सावंतवाडी ता.१९-: येथील सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील गेट पूर्ण सडलेले आहे कधीही कोसळू शकते तसेच त्या खालून अनेक नागरिकांची अधिकाऱ्यांची ये जा वर्दळ चालू असते त्यामुळे ते गेट तात्काळ बदलण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी आज केली.दरम्यान माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी सदर गेटची आज सहकाऱ्यांसोबत पाहणी करत तहसीलदारांचे लक्ष वेधले.
यावेळी सदर ची माहिती श्री भोगटे यांनी तहसीलदार कांबळे यांची भेट घेऊन प्रवेशदराच्या विषयी पूर्ण कल्पना देऊन त्याबाबत गांभीर्य व सडलेल्या गेटचे माहिती देऊन चर्चा केली. त्यावर तहसीलदार कांबळे यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री भोगटे यांना यावेळी दिले.
यावेळी चंद्रकांत जाधव देवा टेमकर महेश नार्वेकर शशिकांत परब सुंदर गावडे सदा सावंत आदी उपस्थित होते.
