तेली समाज उन्नती मंडळ मालवणची वार्षिक सभा संपन्न…

⚡मालवण ता.१७-:
तेली समाज उन्नती मंडळ मालवण या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मालवणातील भंडारी हायस्कूलमध्ये मंडळाचे अध्यक्ष राजन आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सभेचे कामकाज पार पाडत मंडळाच्या पुढील वाटचालीची रूपरेषा आखण्यात आली.

यावेळी मंडळाचे सचिव श्री. शेर्लेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. सन २०२३- २०२४ चा वार्षिक अहवाल सभेपुढे सादर करण्यात आला. मागील लेखापरीक्षण अहवाल सभेपुढे वाचन करून त्यास मंजुरी देण्यात आली. पुढील वर्षाकरिता हिशेब तपासणीसाची नेमणूक करण्यात आली. तसेच दहावी, बारावी आणि पदवीधर उत्तीर्ण मुलांच्या सत्कार समारंभाची तारीख यावेळी ठरविण्यात आली. सन २०२४ – २०२५ पर्यंतच्या वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. तसेच तेली समाजातील ज्या मान्यवरांच्या लग्नास ५० वर्षे पूर्ण झाली त्या उभयतांचा पुढील सभेच्या वेळी सत्कार करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सभेसाठी सहकार्याबद्दल दशरथ कवटकर, बापू तळवडेकर, सदाशिव आरोलकर यांच्यासह उपस्थित सदस्यांचे आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page