अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर:कट्टा येथे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न..
मालवण दि प्रतिनिधी :
स्वराज्याचे तोरण बांधताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत महत्वाची भूमिका बजावणारे हे भंडारी होते. भंडारी समाजाला खूप मोठा इतिहास आहे. मायनाक भंडारी आणि भागोजीशेठ कीर हे भंडारी समाजाचे खूप मोठे नेते होऊन गेले. त्यांनी आपल्या समाजाला मोठी ओळख निर्माण करून दिली. त्यांचे समाजासाठी खूप मोठे योगदान आहे. त्याच समाजाचे आपण सर्वजण वंशज आहोत. आपल्या समाजाच्या वंशजांचे स्मारक प्रत्येक जिल्ह्यात उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे व त्यांच्या कार्याचा वसा पुढे घेऊन जाण्याचे काम आपण सर्वांनी करूया. असे आवाहन अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी मालवण कट्टा येथे बोलताना केले.
मालवण तालुक्यातील कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा यांच्यावतीने भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व दशावतार कला क्षेत्रातील नावलौकिक प्राप्त दशावतारी कलाकार यांचा सन्मान सोहळा कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालय कट्टा येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज अध्यक्ष मामा माडये, आनंद वराडकर, सुनील नाईक, देवगड भंडारी समाज अध्यक्ष हेमंत करंगुटकर, वराडकर हायस्कूल मुख्याध्यापक संजय नाईक, भंडारी समाज कट्टा युवा अध्यक्ष गणेश वाईरकर, ऍड. प्रदीप मिठबावकर, निलेश गोवेकर, लक्ष्मण मुंडये, शाम वाक्कर, गावराई सुकळवाड भंडारी समाज अध्यक्ष बाबुराव मसुरकर, प्रवीण मिठबावकर, अशोक पराडकर, दिलीप वेंगुर्लेकर, सतीश वाईरकर, सपना पावसकर, श्रावणी नाईक, ऍड श्वेता तेंडुलकर वेंगुर्लेकर, गौरी नार्वेकर, तळगाव सरपंच लता खोत, सुरेश कांबळी, निलेश हडकर, मंगेश माडये, सतीश कांबळी, विद्याधर चिंदरकर, सुनील शिरोडकर, चंद्रकांत खोत, किशोर वाक्कर, अनिल पाटील, प्रदीप आवळेगावकर, जीजी वाईरकर, सुनील पोखरणकर, अजय मयेकर, प्रकाश सरमळकर, संतोष नागवेकर, योगेश पाटकर, सुरेंद्र जबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कट्टा पंचक्रोशी भंडारी समाजाचे अध्यक्ष मामा माडये म्हणाले की आपण समाजाचे काहीतरी देणे लागत असतो ज्यावेळी आपण समाजासाठी काही करतो तेव्हा त्याची दखल घेऊन समाजही आपल्यासाठी काही ना काही तरी करतोच विद्यार्थी हे देशाचे पुढील भविष्य आहे. त्यामुळे तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात अजून प्रगती करावी यासाठी समाजाने तुमच्या पाठीवर आज कौतुकाची थाप दिलेली आहे. जी तुम्हाला भविष्यात खूप मोठे होण्याची प्रेरणा देईल. भविष्यात कितीही मोठे झालात तरीही समाजाला मात्र कधीही विसरू नका. कारण समाज आहे तर आपण आहोत. हे लक्षात ठेवा असे सांगितले
यावेळी सुमारे 90 गुणवंत विद्यार्थी व 80 नावलौकिक प्राप्त दशावतार कलाकार यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पप्पू नांदोस्कर ,शाम वाक्कर, सुनील नाईक, गौरी नार्वेकर, ऍड. श्वेता तेंडुलकर वेंगुर्लेकर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी प्रास्ताविक ऍड. प्रदीप मिठबावकर तर आभार संजय नाईक यांनी मानले. रात्रौ याच कलाकारां मधून 27 कलाकारांनी संयुक्तरित्या ‘अगस्तायन’ हे बहारदार दशावतारी नाटक सादर केले.
फोटो :
कट्टा येथे भंडारी समाजातील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. (अमित खोत, मालवण)
