मनसेचे उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्यातर्फे महिलांसाठी मोफत अक्कलकोट दर्शन…

⚡मालवण ता.१७-: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे सिंधुदुर्ग उपजिल्हाध्यक्ष श्री. गणेश वाईरकर हे जुलै महिन्यात मालवण तालुक्यातील महिलांना मोफत अक्कलकोट दर्शन घडवणार आहेत.

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे पक्षाला घवघवीत यश मिळून राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना स्वामी चरणी करण्यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीत मालवण तालुक्यातील २० महिलांना मोफत दर्शन घडणार आहे. यापुढेही दरवर्षी अशाप्रकारे मोफत देवदर्शन सहलीचे नियोजन मनसेच्या वतीने केले जाईल, अशी माहिती गणेश वाईरकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page