Headlines

तत्पर सेवेसाठी वीज कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

केळुस उपसरपंच तथा पत्रकार आबा खवणेकर यांचा स्तुत्य उपक्रम ⚡वेंगुर्ले ता.१२-: या वर्षी सुरूवातीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सुरूवात केल्याने झाडे मोडून तसेच उन्मळून वीज तारांवर पडून विदयुत वाहिन्या तुटल्याचे प्रकार काही ठिकाणी झाले आहेत.तर काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे वीज बंद होण्याचे प्रकार केळुस गावात होत आहेत.अशा प्रकारामुळे बऱ्याच वेळा वीज पुरवठा बंद राहत असल्याने…

Read More

निगुडे-रोणापाल रस्त्यावरील झाड हटविले

वाहतूक सुरळीत : विद्युत पुरवठाही पूर्ववत ⚡बांदा ता.१२-: मुसळधार पावसामुळे निगुडे-रोणापाल रस्त्यावर निगुडे ग्रामपंचायत समोर एक भलं मोठं झाड पडून वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळची वेळ असल्याने महाविद्यालयात जाणारी एसटी व इंग्लिश मीडियमच्या बसेस अन्य मार्गाने हलवाव्या लागल्या. निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी तात्काळ दखल घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने सदरचे झाड बाजूला केले. तालुक्यात सुरू असलेल्या…

Read More

सहाय्यक सहयोगी प्राध्यापक मुलाखती ‘इन कॅमेरा ’ घेण्यात याव्यात: प्रवीण काकडे

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ संघटनेची मागासवर्गीय आयोगाकडे मागणी कणकवली 12 जुलै (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने महाविद्यालये तसेच स्वायत्त उच्च संस्थांसाठी सहायक प्राध्यापक पदासाठी पदभरती प्रक्रिया सुरु केलेली आहे. या अनुषंगाने महाविद्यालयांना त्यांचे संलग्नित विद्यापीठ तसेच मागास वर्ग कक्ष (मा.व.क.), पुणे यांचेकडून बिन्दुनामावली तपासून निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यानुसार बिन्दुनामावली तपासून निश्चित करण्याची प्रक्रिया काही…

Read More

छत्रपतींच्या जुन्या पुतळ्याकडील
सर्विस रोडवरील वीज पोल हटवला

कणकवली नगरपंचायत व पोलीस प्रशासनाची कार्यवाही ⚡कणकवली ता.१२-:कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्विस रोड मधील पुतळा स्थलांतरण केल्यानंतर आता पुतळ्याच्या ठिकाणी असलेला हायमास्टचा पोल हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. कणकवली नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांमार्फत जेसीबी द्वारे हा पोल हटवण्यात आला. दरम्यान हा पोल हटवल्यानंतर या ठिकाणी जुन्या पुतळ्याच्या जागी असलेली रस्त्याचा भाग हा डांबरीकरण करून प्लेन करण्याची…

Read More

शिक्षक समितीने केला गुणवंत पाल्यांच्या सत्कार

ओरोस ता.१२-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा मालवणच्या वतीने संघटनेच्या सभासदांच्या १० वी व १२ वी उत्तीर्ण पाल्यांचा सत्कार सोहळा नुकताच कट्टा नं १ या शाळेत तालुकाध्यक्ष सुयोग धामापूरकर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला .कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सचिव जीवन हजारे यांनी केले. विद्यार्थांना शैक्षणिक…

Read More

कट्टा सेवांगणच्यावतीने आषाढी निमित्त दिंडी

⚡ओरोस ता.१२-: बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे आषाढी एकादशी निमित्त कट्टा एस्टी स्टँड ते विठ्ठल मंदिर कट्टा अशी दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये कट्टा परिसरातील कट्टा गुरामवाडी व कुणकवळे शाळेतील मुले व प्रामुख्याने महिला पालकसहभागी झाले होते. या दिंडीमध्ये कुमार श्राव्य झाटये यानी साकारलेला विठूराया, कुमारी तनिषा म्हाडगुत यानी साकारलेली मुक्ताई साऱ्यांचे लक्ष वेधून…

Read More

रास्तधान्य दुकानदार व केरोसीन विक्रेते यांनी छेडले आंदोलन

विविध समस्यांकडे वेधले लक्ष सिंधुदुर्गनगरी ता ११रास्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारकाना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि विविध मागण्याकड़े शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा रास्त दर धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आपल्या मागण्या बाबत…

Read More

राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेसाठी जोरदार चुरस

१३ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात ⚡ओरोस ता.१२-: सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होणार आहे. विद्यमान संचालकांचे सहकार वैभव पॅनल विरोधात श्री रवळनाथ परिवर्तन पॅनल यांच्यात ही लढत होत आहे. एकूण १५ संचालक निवडून द्यायचे आहेत. यातील दोन संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित १३ जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात आहेत. केवळ…

Read More

बंदरजेटीवर मावळ्यांचे १२ पुतळे

पर्यटनात पडली भर: आ नाईक यांची संकल्पना;मयेकर कुटुंबाची कलाकृती मालवण (प्रतिनिधी) मालवण शहर व बंदर जेटी सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा नियोजन मधून उपलब्ध केलेल्या निधीतून मालवणच्या नवीन बंदर जेटीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे १२ पुतळे बसविण्यात आले आहेत. हे पुतळे मालवणचे सुपुत्र गणेश मयेकर यांच्या स्कल्प कंपनी व शिल्पकार प्रशांत मयेकर…

Read More

…आणि छत्रपतीच्या नवीन पुतळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर

⚡कणकवली ता.११-:कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नवीन छत्रपतींचा पुतळा बसविण्यात आल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता प्रशासकीय यंत्रणा दक्ष झाली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन बसवण्यात आलेल्या पुतळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गेले चार दिवस चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून दंगल नियंत्रण पथकाबरोबरच पोलीस…

Read More
You cannot copy content of this page