Headlines

भाजप मालवण कार्यालयात योग दिन उत्साहात साजरा…

⚡मालवण ता.२२-:
भारतीय जनता पार्टीच्या मालवण कार्यालयात रविवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग प्रशिक्षक मरीना फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके केली.

या योग दिन कार्यक्रमात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, नगरसेविका तथा नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर, पूजा वेरलकर, महिमा मयेकर, अमृता फाटक, नगरसेवक रविकिरण तोरस्कर, ललित चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी मार्गदर्शन करताना योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन शांत होते आणि विचारांमध्ये सकारात्मकता निर्माण होते. आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव, चिंता आणि अस्वास्थ्य वाढत असताना योगाचे महत्त्व अधिक वाढले आहे. योग हा एका दिवसाचा उपक्रम नसून तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला पाहिजे, असे सांगितले. तर नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांनी योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे, हजारो वर्षांपासून आपल्या ऋषी-मुनींनी योगाच्या माध्यमातून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्याचा मार्ग दाखवला आहे. योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याची एक पद्धत आहेझ त्यामुळे नियमित योगाभ्यास केला पाहिजे, असे सांगितले.
योग प्रशिक्षक मरीना फर्नांडिस यांनीही मार्गदर्शन केले

You cannot copy content of this page