Headlines

माऊली मित्रमंडळाचा सामाजिक उपक्रम…

रुग्णांना फळे वाटप करून नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा..

⚡कणकवली ता.२३-: महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

या कार्यक्रमास माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील कानेकर, किशोर चव्हाण, जमील खुरेशी, प्रकाश चव्हाण,तसेच मित्रमंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. याशिवाय उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक सचिन डोंगरे, डॉ. माधव उबाळे, इन्चार्ज सायली तिवरेकर, जे. आर. थिटे, पायल मोर्य, पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page