Headlines

कबीराच्या आंबा वळणावर एसटी-स्कॉर्पिओची समोरासमोर धडक…

स्कॉर्पिओचे मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली..

⚡देवगड ता.२२-:
एसटी बसची स्कॉर्पिओ गाडीला समोरून धडक बसून झालेल्या अपघातात स्कॉर्पिओ गाडीच्या समोरील बाजुचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.हा अपघात सोमवारी सकाळी १०.४० वा.सुमारास देवगड मोंड बापर्डे मार्गावर मोंड हॉस्पिटलनजिक मोंडपार कबीराचा आंबा येथील वळणावर झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, देवगड आगाराची वानिवडे देवगड ही बस वानिवडे येथून बापर्डे मोंड मार्गे देवगडकडे येत असताना सोमवारी सकाळी १०.४० वा.सुमारास देवगड मोंड बापर्डे मार्गावर मोंड हॉस्पिटलनजिक मोंडपार कबीराचा आंबा येथील वळणावर समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम्.एच्.०७-अ‍ेएस् ५०५३ या गाडीला समोरील बाजुस जोरदार धडक बसली.या अपघातात स्कॉर्पिओ गाडीच्या समोरील बाजुचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मोंडपार मानेलवाडी येथिल गणेश मोहन कार्लेकर(५८) हे वाडातर येथून घरी त्यांचा स्कॉर्पिओ गाडीने जात होते.तर एसटी चालक लहू रामचंद्र सावंत(४५) रा.करूळ वैभववाडी हे वानिवडे देवगड ही गाडी घेवून देवगडकडे येत होते.एसटीमध्ये तीन प्रवाशी होते तर स्कॉर्पिओ गाडीत गणेश कार्लेकर हे एकटेच होते.

सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.या अपघातामुळे वाहतुक ठप्प झाली होती.अपघाताची माहिती समजताच स्थानिक ग्रामस्थ, एसटी आगाराचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस दाखल झाले.अपघातग्रस्त दोन्ही वाहनांना बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली.दरम्यान स्कॉर्पिओ चालक गणेश मोहन कार्लेकर यांनी देवगड पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी एसटी चालक लहू सावंत यांनी रस्त्याचा विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील एस्टी बस रस्त्याचा विरूध्द दिशेने व भरधाव वेगाने निष्काळजीपणाने चालवून स्कॉर्पिओ गाडीला धडक दिली व त्या गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी एसटी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलिस हवालदार आशिष कदम करीत आहेत.

You cannot copy content of this page